Bank Holidays in Year 2021: नववर्षात किती मिळणार सुट्ट्या आणि Long Weekends; येथे पहा संपूर्ण यादी
Bank Holidays 2021| File Image

Bank Holidays in Year 2021: 2020 हे वर्ष काही दिवसांत संपणार असून लवकरच नववर्षाचे आगमन होईल. नववर्ष म्हटलं की सर्वांच्याच मनात उत्साह, उमेद, आनंद निर्माण होतो. गतवर्षी पूर्ण न होऊ शकलेल्या इच्छा, आकांक्षा नव्या वर्षात पूर्ण करता येतील, असे आशा मनी दाटते. नववर्षात काय नवीन होणार, काय खास असणार याची उत्सुकता असते. त्याचबरोबर सुट्ट्यांची चंगळ अनुभवायला देखील मंडळी उत्सुक असतात. 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन, 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन, 2 ऑक्टोबर गांधी जयंती याशिवाय 2021 मध्ये इतर सुट्ट्या नेमक्या कधी असणार, लॉन्ग विकेंड (Long Weekend) किती मिळणार? त्याचबरोबर दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी मिळणारा बँक हॉलिडेज या सगळ्यावर एक नजर टाकूया.... (January 2021 Festival Calendar: जानेवारी 2021 महिन्यातील 'हे' दिवस महत्त्वाचे; जाणून घ्या सण आणि उपवासाच्या तारखा)

जानेवारी ते डिसेंबर पर्यंतच्या बँक हॉलिडेजची (Bank Holidays in Year 2021) संपूर्ण यादी:

जानेवारी 2021

1 जानेवारी, शुक्रवार- नववर्ष

त्यानंतर 2, 3 जानेवारीला शनिवार, रविवार आल्याने लॉन्ग विकेंड एन्जॉय करता येईल.

9 जानेवारी, दुसरा शनिवार

14 जानेवारी, गुरुवार- मकर संक्रांत

23 जानेवारी, चौथा शनिवार

26 जानेवारी, मंगळवार- प्रजासत्ताक दिन

2021 फेब्रुवारी

13 फेब्रुवारी, दुसरा शनिवार

16 फेब्रुवारी, मंगळवार - बसंत पंचमी

27 फेब्रुवारी, चौथा शनिवार

मार्च 2021

11 मार्च, गुरुवार- महाशिवरात्री

13 मार्च, दूसरा शनिवार

27 मार्च, चौथा शनिवार

29 मार्च, सोमवार- धुलिवंदन

एप्रिल 2021

2 एप्रिल, शुक्रवार - गुड फ्रायडे

8 एप्रिल, गुरुवार - बुद्ध पौर्णिमा

10 एप्रिल, दुसरा शनिवार

14 एप्रिल, गुरुवार - आंबेडकर जयंती

21 एप्रिल, बुधवार - राम नवमी

24 एप्रिल - चौथा शनिवार

25 एप्रिल, रविवार - महावीर जयंती

मे 2021

1 मे, शनिवार - कामगार दिन

8 मे, दुसरा शनिवार

12 मे, बुधवार-ईद-उल-फितर

22 मे, चौथा शनिवार

जून 2021

12 जून, दूसरा शनिवार

26 जून, चौथा शनिवार

जुलै 2021

10 जुलै, दुसरा शनिवार

20 जुलै, मंगळवार - बकरीद / ईद अल-अदा

24 जुलै, चौथा शनिवार

ऑगस्ट 2021

10 ऑगस्ट, मंगळवार - मुहर्रम

14 ऑगस्ट, दुसरा शनिवार

15 ऑगस्ट, रविवार - स्वातंत्र्य दिन

22 ऑगस्ट, रविवार - रक्षाबंधन

28 ऑगस्ट, चौथा शनिवार

30 ऑगस्ट, सोमवार - कृष्णा जन्माष्टमी

सप्टेंबर 2021

10 सप्टेंबर, शुक्रवार - गणेश चतुर्थी

11 सप्टेंबर, शनिवार - दुसरा शनिवार

25 सप्टेंबर, शनिवार - चौथा शनिवार

ऑक्टोबर 2021

2 ऑक्टोबर, शनिवार - गांधी जयंती

9 ऑक्टोबर, दुसरा शनिवार

15 ऑक्टोबर, शुक्रवार - दसरा (विजयादशमी)

18 ऑक्टोबर, सोमवार - ईद-ए-मिलाद

23 ऑक्टोबर, चौथा शनिवार

नोव्हेंबर 2021

4 नोव्हेंबर, गुरुवार - दिपावली

6 नोव्हेंबर, शनिवार - भाऊबीज

13 नोव्हेंबर, दुसरा शनिवार

19 नोव्हेंबर, शुक्रवार - गुरु नानक जयंती

27 नोव्हेंबर, चौथा शनिवार

डिसेंबर 2021

11 डिसेंबर, दुसरा शनिवार

25 डिसेंबर, शनिवार (चौथा) - ख्रिसमस

ही सुट्ट्यांची लिस्ट पाहिल्यानंतर तुम्ही नक्कीच आनंदीत झाला असाल. त्याचबरोबर नववर्षात नातेवाईक, मित्रमंडळी यांच्यासह हॉलिडेज प्लॅन करण्यासाठी ही यादी तुमच्या नक्की कामी येईल.