
शिवसेना प्रमुख बाळ ठाकरे (Bal Thackeray) यांची आज 97 वी जयंती आहे. बाळ ठाकरे यांच्या जन्मदिनाचं (Bal Thackeray Jayanti) औचित्य साधत अनेकांकडून आज जुन्या आठवणींना उजाळा दिला जात आहे. दरम्यान महाराष्ट्रातील भूमिपुत्रांच्या न्याय आणि हक्कांसाठी बाळासाहेबांनी आवाज बुलंद करत शिवसेना पक्षाची सुरूवात केली. सुरूवातीला व्यंगचित्रकार आणि कालांतराने शिवसेना प्रमुख म्हणून त्यांनी मराठी लोकांच्या हितासाठी कणखर भूमिका घेतली. रस्त्यावरचा सामान्य माणूस ते मुरब्बी राजकारणी, कलाकार, उद्योगपती, खेळाडू त्यांचे चाहते होते. आज त्यांच्या जन्मदिनाचं औचित्य साधत बाळासाहेबांना आदरांजली अर्पण करण्यासाठी लेटेस्टली टीम कडून तयार करण्यात आलेले हे काही HD Images तुम्ही सोशल मीडीयात WhatsApp Status, Messages द्वारा शेअर करत तुम्हीही त्यांना श्रद्धांजली अर्पण करू शकता.
संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीपासून महाराष्ट्राशी निगडीत अनेक गोष्टींमध्ये बाळासाहेबांनी कणखर भूमिका मांडली आहे. बाबरी मशिदी आणि अयोद्धेतील राम मंदिर निर्मितीमध्येही हिंदूच्या बाजूने ठाकरे ठामपणे उभे होते. हळूहळू शिवसेना प्रमुखांचा करिश्मा भारतभर पोहचला आणि बाळ ठाकरे हिंदुहृद्यसम्राट बनले. शिवसेना पक्षाच्या जडणघडणीमध्ये त्यांनी अनेक सामान्यातील सामान्य व्यक्तीला राजकारणाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणून शाखाप्रमुखापासून अगदी मुख्यमंत्री पदापर्यंत अनेक मोठ्या जबाबदार्या सोपवल्या. त्यामुळे त्यांच्याभोवती आजही सर्वसामान्य शिवसैनिकाचं वलय आणि नितांत प्रेम आहे. नक्की वाचा: Balasahebancha Raj: ठाकरे काका-पुतण्यांवर आधारित मराठी रंगभूमीवर येणार नाटक; बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती दिवशी 'बाळासाहेबांचा राज'चा पहिला प्रयोग .
बाळ ठाकरे जयंती





बाळ ठाकरे हे बहुआयामी व्यक्तिमत्त्व होते. समाजसुधारक प्रबोधनकार ठाकरे यांचा वसा त्यांनी पुढे चालवला. ओघवती वत्कृत्त्वशैली, कलेची उत्तम जाण असलेले बाळ ठाकरे शालेय शिक्षण पूर्ण करू शकले नाही पण त्यांची जिज्ञासूवृत्ती त्यांना कायम प्रभावशाली व्यक्तिमत्त्व बनवत राहिली. मागील काही महिन्यांमध्ये बाळ ठाकरेंनी स्थापन केलेल्या शिवसेना पक्षामध्ये फूट पडली आहे. अनेक शिवसैनिक विखुरले गेले आहेत. या राजकीय घडामोडीनंतर यंदाची ही पहिली जयंती असल्याने ठाकरे आणि शिंदे गटाकडून विविध ठिकाणी या जयंती निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.