Angarki Sankashti Chaturthi 2022 Date and Time: अंगारकी संकष्टी चतुर्थीची तिथी आणि महत्त्व, जाणून घ्या
अंगारकी संकष्टी । File Image

अंगारकी संकष्टी चतुर्थी ही सर्वात शुभ मानली जाते.अंगारकी संकष्टी चतुर्थी हा सण कृष्ण पक्षाच्या चौथ्या दिवशी साजरा केला जातो. अंगारकी हा संस्कृत मूळचा शब्द आहे ज्याचा अर्थ ‘जाळलेल्या कोळशासारखा लाल’ असा होतो. हा सण मंगळवारी येतो तेव्हा त्याला 'अंगारकी चतुर्थी' असे म्हणतात. अंगारकी संकष्टी चतुर्थी भगवान गणेशाला समर्पित आहे. 19 एप्रिल रोजी भाविक अंगारकी संकष्टी चतुर्थी 2022 साजरी करतील. अंगारकी चतुर्थीची तिथी, वेळ आणि महत्त्व जाणून घ्या.[हे देखील वाचा : Angaraki Sankashti Chaturthi April 2022: अंगारकी संकष्टी चतुर्थी निमित्त प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरात रात्री 1.30 पासून होणार बाप्पाच्या दर्शनाला सुरूवात; पहा दिवसभराच्या आरती, दर्शनाचं वेळापत्रक ]

अंगारकी संकष्टी चतुर्थी 2022 तिथी आणि महत्त्व

भगवान गणेशाचे भक्त सकाळी लवकर उठतात आणि भगवान गणपतीला त्यांचे आवडते गोड, मोदक अर्पण करून आणि त्यांची मूर्ती फुलांनी सजवून त्यांची पूजा करतात. अंगारकी संकष्टी चतुर्थीला सूर्योदयापासून कडक उपवास करतात आणि चंद्र दिसल्यावर उपवास सोडतात. काही लोक फक्त फळे, भाज्या आणि वनस्पतींची मुळे खातात. तसेच अंगारकी चतुर्थीच्या दिवशी भगवान चंद्राला चंदनाची पेस्ट, फुले आणि तांदूळ अर्पण करून त्यांची पूजा केली जाते.

अंगारकी संकष्टी चतुर्थी तिथी 

अंगारकी संकष्टी चतुर्थी 19 एप्रिल रोजी दुपारी 04:39 वाजता सुरू होईल आणि 20 एप्रिल रोजी दुपारी 01:53 वाजता समाप्त होईल.

अंगारकी संकष्टी चतुर्थी  महत्त्व

अंगारकी चतुर्थीचा उपवास केल्याने समस्या कमी होतात असे मानले जाते, कारण वैदिक शास्त्रांमध्ये भगवान गणेश हे प्रथम देवता मानले जातात. लोकांचा असा विश्वास आहे की भगवान गणेशचा आशीर्वाद मिळाल्याने जीवनातील सर्व अडथळे दूर होतात. गणपतीचे आशीर्वाद मिळावा त्यासाठी अथर्वशीर्ष पठण केले जाते. भगवान गणेशाच्या पूजेसाठी या दिवशी भजने आणि धार्मिक भजनही गायले जातात. शिवाय उपवास केल्याने मांगलिक दोष दूर होतो आणि इच्छा पूर्ण होतात, असा विश्वास आहे.