Anganewadi Jatra 2020 Date: आंंगणेवाडीतील भराडी देवी जत्रा तारीख जाहीर; यंदा 17 फेब्रुवारी दिवशी रंगणार उत्सव
आंगणेवाडी जत्रा 2020 । File Photo

Anganewadi Bharadi Devi Jatra 2020: डिसेंबर महिना आला की कोकणवासीयांमध्ये दरवर्षी भरणार्‍या आंगणेवाडी जत्रेच्या तारखेची (Anganewadi Jatra Date) उत्सुकता असते. यंदा आंगणेवाडीतील भराडीदेवीचा उत्सव  17 फेब्रुवारी 2020 दिवशी होणार आहे. मालवणातील (Malvan) आंगणेवाडीतील भराडीदेवीची जत्रा (Bharadidevi Jatra) ही अनेकांसाठी श्रद्धास्थान आहे. दीड दिवसाच्या भराडी देवीच्या या यात्रेसाठी केवळ कोकणवासीय नव्हे देशा-परदेशातील श्रद्धाळू भाविक उत्सुक असतात. त्यामुळे देवीचा कौल लावून काढली जाणारी भराडी देवीच्या यात्रेबाबत मोठी उत्सुकता असते. Anganewadi Bharadi Devi Jatra: आंगणेवाडीच्या भराडी देवी जत्रेबद्दल '8' खास गोष्टी

आंगणेवाडीच्या भराडीदेवीची ख्याती ही नवसाला पावणारी अशी असल्याने मुंबई, पुणे येथील लाखो चाकरमणी आंगणेवाडीच्या भराडीदेवीच्या दीड दिवसाच्या जत्रेसाठी लाखोच्या संख्येने कोकणात दाखल होतात. दरम्यान आंगणे कुटुंबीयांकडून मंदिरात यंदाच्या तारखेची घोषणा करण्यात आली आहे. या अधिकृत घोषणेनंतर गावात सर्वत्र वार्षिक जत्रेची तारीख सांगितली जाते. भिंतीवर, रिक्षा, एस टीवर ही तारीख लिहण्याची पद्धत आहे.  Anganewadi Bharadi Devi Jatra: आंगणेवाडीच्या भराडी देवी जत्रेसाठी कसे पोहचाल?

आंगणेवाडीच्या जत्रेबाबत सामान्यांसोबतच राजकारणी, कलाकार, खेळाडू देखील या जत्रेसाठी हजर राहतात. मागील वर्षी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आंगणेवाडीच्या जत्रेला पोहचले होते तर 2014 च्या लोकसभा निवडणुकीनंतर 18 खासदारांसह उद्धव ठाकरे भराडी देवीच्या दर्शनाला पोहचले होते.