Horoscope Today आजचे राशीभविष्य, मंगळवार 31 ऑक्टोबर 2023: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस
राशी भविष्य- (फोटो सौजन्य- फाइल इमेज)

Aajche Rashi Bhavishya 31 October 2023 in Marathi: आजचे राशीभविष्य, मंगळवार 31 ऑक्टोबर 2023 या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल, कोणत्या राशीच्या व्यक्तींचे चमकणार नशीब, कोणाला हा दिवस ठरणार शुभ तर कोणाला अशुभ, जाणून घ्या मंगळवार म्हणजेच आजच्या दिवसाचे तुमचे राशीभविष्य.

मेष (Aries Horoscope Today): मेष राशीच्या व्यक्तींच्या घरगुती जीवनात तणाव येणे शक्य आहे. व्यवसायिकांनी मोठी गुंतवणूक न करणे हे उत्तम. अनावश्यक खर्च नियंत्रणात ठेवा. अनावश्यक वादांकडे लक्ष देऊ नका. आज कामाच्या ठिकाणी दक्ष राहण्याची गरज आहे.

शुभ उपाय- पिंपळाला जल द्या.

शुभ दान- गरजूला वस्त्र दान करा.

शुभ अंक- 3

शुभ रंग- निळा

वृषभ (Taurus Horoscope Today): वृषभ राशीच्या मंडळींचा आजचा दिवस सकारात्मक राहील. नोकरवर्गाला कदाचित काही समस्या भेडसावतील. व्यवसायिकांना नफा होईल. बेकायदेशीर प्रकरणांपासून दूर रहा. गृहसौख्य लाभेल. आई-वडिलांच्या आरोग्याची काळजी घ्या.

शुभ उपाय- गाईला दुध मिश्रित भात घालावा

शुभ दान- धातूच्या वस्तूचे दान करा.

शुभ अंक- 1

शुभ रंग- हिरवा

मिथुन (Gemini Horoscope Today): आज प्रकृतीची काळजी घेणे महत्वाचे आहे. खर्च नियंत्रणात ठेवा, कारण येणारा पैसा थोडा आखडू शकतो. कर्ज घेणे टाळा. व्यवसायिकांना आजचा दिवस लाभदायक ठरण्याची शक्यता. जोडीदाराचा सल्ला फायद्याचा ठरेल.

शुभ उपाय- वाहत्या पाण्यात नारळ सोडा.

शुभ दान- कोणत्याही गोड पदार्थाचे दान करा.

शुभ अंक- 5

शुभ रंग- पांढरा

कर्क (Cancer Horoscope Today): कर्क राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस संमिश्र आहे. कुटुंबातील सदस्यांसोबत घनिष्टता चांगली राहणार नाही. तब्येतीबद्दल काळजी घेणे आवश्यक. आर्थिक व्यवहारांमध्ये त्वरित समोरच्यावर विश्वास ठेऊ नका. आज डोळे आणि कान उघडे ठेवून चालण्याची गरज आहे. कामाचा भार वाढेल.

शुभ उपाय- सकाळी हनुमान चालीसा वाचा.

शुभ दान- पिवळ्या रंगांचे वस्त्र पुजाऱ्यांना दान करा.

शुभ अंक- 9

शुभ रंग- पिवळा

सिंह (Leo Horoscope Today): सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस सकारात्मक असेल. जोडीदारासोबत नाते उत्तम राहील. आर्थिक बाबी मार्गी लागण्याची शक्यता. गुंतवणुकीचा विचार कराल, मात्र मोठे खर्च आज करणे टाळा. स्वतःला अध्यात्मामध्ये गुंतवा ज्यामुळे मन थाऱ्यावर राहील. दुरचा प्रवास शक्यतो टाळा.

शुभ उपाय- सकाळी महादेवाच्या पिंडीला बेलपत्र वाहा.

शुभ दान- मंदिर उभारणीच्या कामाला हातभार लावा.

शुभ अंक- 7

शुभ रंग- केशरी

कन्या (Virgo Horoscope Today): आजचा दिवस अनुकूल नाही. अनेक बाबतीत काळजी घेण्याची गरज आहे. आज कुटुंबातील सदस्यांसोबत खटके उडण्याची शक्यता. तब्येतदेखील बिघडण्याचे संकेत आहेत. आर्थिक बाबतीत हात आखडता घ्या. नोकरीत मोठ्या समस्या भेडसावणार नाहीत, मात्र व्यवसायात तेजी दिसून येणार नाही.

शुभ उपाय- सकाळी अंघोळीनंतर तुळशीची पूजा करा.

शुभ दान- भुकेल्याला जेवण द्या.

शुभ अंक- 6

शुभ रंग- गुलाबी

तुळ (Libra Horoscope Today): आज कुटुंबात एकोपा राहील त्यामुळे महत्वाचे कौटुंबिक निर्णय घेऊ शकाल. नोकरीतील लोकांचे आयुष्य उत्तम असेल. अनपेक्षित खर्च होऊ शकतात. पैसे उसने देताना किंवा घेताना दक्ष राहा. जोडीदारासोबत समजूतदारपणा दाखवा.

शुभ उपाय- गायत्री मंत्राचा जप करा.

शुभ दान- काचेच्या वस्तूचे दान करा.

शुभ अंक- 4

शुभ रंग- जांभळा

वृश्चिक (Scorpio Horoscope Today): आज जवळजवळ प्रत्येक बाबतीत आपल्या जोडीदाराशी जुळवून घेण्याची गरज आहे. वैयक्तिक जीवनात चढ-उतार येतील. मुलांच्या वर्तनामुळे मानसिक ताण येण्याची शक्यता. आळसावर नियंत्रण ठेऊन स्वतःला कार्यरत ठेवा. प्रयत्नांवर नकारात्मक परिणाम होऊ देऊ नका.

शुभ उपाय- महादेवाच्या पिंडीला बेलपत्र वाहा.

शुभ दान- धान्याचे दान करा.

शुभ अंक- 8

शुभ रंग- पोपटी

धनु (Sagittarius Horoscope Today): आज भावंडांसोबत तंटा उत्पन्न होण्याची शक्यता आहे, त्यामुळे जिभेवर नियंत्रण असू द्या. नोकरदार वर्गासाठी आजचा दिवस सकारात्मक असेल. आर्थिक बाबी मार्गी लागतील. परंतु घोटाळे आणि फसवणूक यांच्यापासून स्वतःचे रक्षण करा. व्यवसायिकांनी आजच्या निर्णयांबद्दल खबरदारी घ्या. बेकायदेशीर गोष्टी आणि प्रकरणांपासून दूर राहा.

शुभ उपाय- सकाळी कुलदैवतेच्या नावाचा जप करा.

शुभ दान- गरजू व्यक्तीला आर्थिक मदत करा.

शुभ अंक- 1

शुभ रंग- लाल

मकर (Capricorn Horoscope Today): वैयक्तिक जीवनात समाधान मिळेल. अपचन किंवा डोकेदुखीचा त्रास उद्भवण्याची शक्यता. आर्थिक आघाडीवर फायद होण्याची शक्यता. नोकरीमार्फत काही मोठ्या संधी चालून येतील मात्र कष्टासाठी तयार रहा. प्रतिष्ठा व आदर मिळेल. तुमच्यापैकी काही जणांना नवीन आणि अधिक चांगली नोकरी मिळेल. आज कर्ज किंवा उसने घेणे टाळा.

शुभ उपाय- वाहत्या पाण्यात नारळ सोडा.

शुभ दान- भात, गुळ व चणे यांचे देवळात दान द्या.

शुभ अंक- 3

शुभ रंग- निळा

कुंभ (Aquarius Horoscope Today): आज किरकोळ समस्या उद्भवतील मात्र परिस्थिती हाताबाहेर जाणार नाही. आर्थिक जीवन सौख्याचे राहील. जवळच्या मित्रांचा सल्ला फायद्याचा ठरेल. नोकरीत नाव, प्रतिष्ठा आणि प्रगती दिसून येईल. तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका. जोडीदार किंवा आई-वडिलांसोबत बोलताना काळजी घ्या. कोणाचे मन दुखवू नका.

शुभ उपाय- सकाळी अंघोळीनंतर गणपतीची पूजा करा.

शुभ दान- मंदिरात तेलाचे दान करा.

शुभ अंक- 5

शुभ रंग- लाल

मीन (Pisces Horoscope Today): मीन राशीच्या लोकांसाठी संमिश्र दिवस. कौटुंबिक स्थिती फारशी आशादायक असणार नाही. काळजीपूर्वक वर्तन आणि हुशारीने कृती करणे तुमच्या मार्गीतल समस्या दूर ठेवण्यासाठी अत्यावश्यक आहे. आज घडलेली कोणतीही चूक पुढे नुकसानदायक ठरू शकते. प्रकृतीची काळजी घ्या. भागीदारीत कोणतेही काम सुरु करू नका.

शुभ उपाय- बाहेर जाण्याआधी कुलदैवतेचे नामस्मरण करा.

शुभ दान- शक्य असण्यास आर्थिक मदत करा.

शुभ अंक- 2

शुभ रंग- पांढरा