Air India Urination Case: एअर इंडिया (Air India) च्या विमानात महिला प्रवाशावर लघवी केल्याचे प्रकरण आता न्यायालयात सुरू असून आरोपी शंकर मिश्राला अटक केल्यानंतर न्यायालयात दोन्ही बाजूंकडून युक्तिवाद करण्यात येत आहे. विशेष बाब म्हणजे आरोपी मिश्राच्या वकिलाने कोर्टात सांगितले की, शंकर मिश्राने महिलेवर लघवी केली नाही, तर महिलेने स्वतः लघवी केली. मात्र, याचा आरोप शंकर मिश्रा यांच्यावर लावण्यात आला होता. त्यावर कोर्टातील न्यायाधीशांनी आरोपी मिश्राच्या वकिलाला खडतर प्रश्न विचारले.
विमानात लघवी केल्याच्या प्रकरणावर सुनावणी सुरू झाली तेव्हा आरोपी शंकर मिश्रा यांच्या वकिलांनी युक्तिवाद केला की, महिलेच्या सीटपर्यंत पोहोचणे शक्य नव्हते. कारण महिलेची सीट आडवी होती. वकिलाने न्यायालयाला असेही सांगितले की महिलेने स्वतःवर लघवी केली. कारण तिला इनकॉन्टिनेंस नावाचा आजार आहे. यामागे युक्तिवाद करताना वकिलाने सांगितले की, ती महिला कथ्थक नर्तक आहे आणि 80 टक्के कथ्थक नर्तकांना ही समस्या जाणवते. (हेही वाचा - Air India passenger urinating case: एअर इंडियाच्या विमानात महिलेवर लघुशंका करणाऱ्या प्रवाशास बंगळूरुत अटक)
यानंतर सत्र न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी फ्लाइटमध्ये प्रवासी एका बाजूने दुसऱ्या बाजूने जाणे अजिबात अशक्य नाही, अशी टिप्पणी केली. मी देखील फ्लाईटमध्ये प्रवास केला आहे आणि मला माहित आहे की कोणत्याही रांगेत बसलेली व्यक्ती इतर कोणत्याही सीटवर जाऊ शकते. यानंतर न्यायाधीशांनी फ्लाइटमधील सीटिंग डायग्राम मागितली.
दरम्यान, दिल्ली पोलिसांनी मॅजिस्ट्रेट कोर्टाच्या त्या आदेशाला आव्हान दिले आहे. ज्यामध्ये कोर्टाने आरोपी शंकर मिश्रा याला कोठडी देण्यास नकार दिला होता. मिश्रा यांच्या 7 दिवसांची पोलिस कोठडी पोलिसांनी मागितली होती. शंकर मिश्रा यांच्यावर मद्यधुंद अवस्थेत दुसऱ्या सीटवर बसलेल्या महिलेवर लघवी केल्याचा आरोप आहे. चौकशीसाठी आणि प्रकरणाच्या तळापर्यंत पोहोचण्यासाठी आरोपींची कोठडी आवश्यक असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.