Photo Credit- X

Woman Dies after Hospital Lift Crashe: लोहियानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका हॉस्पिटलमध्ये गुरुवारी सायंकाळी लिफ्ट कोसळल्याने एका बाळंत महिलेचा मृत्यू (Meerut Hospital Lift Crash)झाला. लिफ्टच्या गेटमध्ये महिलेची मान अडकली होती. सुमारे तासभर महिला लिफ्टमध्ये अडकून राहिली. शेवटी कटरने लिफ्टचे गेट कापून महिलेचा मृतदेह बाहेर काढण्यात (Woman Dies after Hospital Lift Crashe)आला. या घटनेमुळे रुग्णालयातील कर्मचारी आणि डॉक्टरदेखील घाबरले होते. महिलेच्या मृत्यूमुळे कुटुंबीय संतप्त झाले आणि त्यांनी रुग्णालयात एकच गोंधळ घातला. (Toddler Dies After Balloon Bursts in Lucknow: खेळता-खेळता गळ्यात अडकला फुगा; अडीच वर्षाच्या मुलाचा मृत्यू)

किथोरेच्या बेहरोरा गावात राहणारे अंकुश मावी यांनी गुरुवारी सकाळी पत्नी करिश्मा यांना प्रसूतीसाठी कॅपिटल हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. दुपारी प्रसूती झाली. त्यांना मुलगी झाली. मुलीला पाळणाघरात ठेवले होते. सायंकाळी ५.४५ च्या सुमारास रुग्णालयातील कर्मचारी करिश्मा यांना लिफ्टमधून तळमजल्यावर स्ट्रेचरवर आणत होते. करिश्माचा स्ट्रेचर लिफ्टच्या आत जाताच लिफ्ट कोसळली आणि करिश्माची मान गेटमध्ये अडकली. आत लिफ्टमध्ये उपस्थित असलेल्या दोन कर्मचाऱ्यांनी वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र तो काही उपयोग झाला नाही. गुदमरल्यामुळे करिश्माचा मृत्यू झाला.

यानंतर रुग्णालयातील कर्मचारी फरार झाले. या घटनेनंतर करिश्माच्या कुटुंबातील इतर सदस्य हॉस्पिटलमध्ये गोंधळ घातला. संतप्त जमावाने रुग्णालयाची तोडफोड करून अनेक मशिन फेकून दिल्या. यानंतर सायंकाळी सहाच्या सुमारास लिफ्ट तोडण्याचे काम सुरू करण्यात आले. सुमारे तासाभरानंतर करिश्माचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.(UP Shocker: जमिनीच्या लालसेपोटी तीन भावांनी आपल्या आई आणि बहिणीला जिवंत जाळून मारले; गुन्हा दाखल, तपास सुरु)

घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली. रुग्णालयातील सर्व रुग्णांना इतर रुग्णालयात पाठवण्यात आले. सध्या पोलीस तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करण्याची तयारी करत आहेत.

ओव्हरलोडमुळे लिफ्ट तुटल्याचे सांगितले जात आहे. या अपघातात रुग्णालयातील काही कर्मचारीही जखमी झाले आहेत. गंभीर रुग्णांना रुग्णालयातून हलवण्यात आले आहे. तपासणीत रूग्णालय निकषांनुसार ठीक असल्याचे आढळून आले, परंतु दरवर्षी लिफ्टची देखभाल करणे बंधनकारक आहे. देखभाल झाली की नाही हे तपासात स्पष्ट होईल.