Toddler Dies After Balloon Bursts in Lucknow: लखनऊ (Lucknow) च्या ठाकूरगंज भागात (Thakurganj Area) एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. खेळता-खेळता फुगा फुटून गळ्यात अडकल्याने एका अडीच वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला. फुगा गळ्यात अडकल्याने त्यांला श्वास घेण्यास त्रास होत होता. कुटुंबीयांनी तातडीने मुलाला खासगी रुग्णालयात नेले. त्याची गंभीर प्रकृती पाहून खासगी रुग्णालयाने त्याला ट्रॉमा रेफर केले. तेथे पोहोचण्यापूर्वीच मुलाचा मृत्यू झाला. तपासणी केल्यानंतर मुलाला मृत घोषित करण्यात आले. या भीषण घटनेनंतर मृत मुलाच्या कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
काय आहे नेमक प्रकरण?
ठाकूरगंज दौलतगंज येथील काशी विहार येथील फुलमती मंदिराजवळ राहणाऱ्या केटरर विनय गुप्ता यांचा अडीच वर्षांचा मुलगा शिवांश बुधवारी दुपारी घराबाहेर खेळत होता. कुटुंबीयांनी मुलाला फुगा दिला होता. जो तो तोंडाने फुगवत होता. फुगवताना फुगा फुटला आणि शिवांशच्या गळ्यात अडकला.त्यामुळे शिवांशला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. काही वेळाने इकडे-तिकडे धावून तो खाली पडला आणि बेशुद्ध झाला. हे पाहून घरच्यांनी धावत जाऊन त्याला उचलून घरात आणले. घशात अडकलेला फुगा काढण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना यश आले नाही. (हेही वाचा -Chicken Gets Stuck in Throat: बिर्याणी खाताना चिकनचा तुकडा घशात अडकला; एकाचा मृत्यू)
शिवांशच्या कुटुंबियांनी प्रथम त्याला जवळच्या खाजगी रुग्णालयात नेले. तिथल्या डॉक्टरांनी हार मानली. कुटुंबीयांनी मुलाला ट्रॉमा सेंटरमध्ये नेले मात्र तपासणीनंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेनंतर कुटुंबावर शोककळा पसरली. कुटुंबीयांनी पंचनामा करून शिवांशच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. विनयला आणखी चार महिन्यांचा मुलगा आहे. (हेही वाचा -Woman Saree Gets Stuck On Train Doors: दिल्ली मेट्रोच्या दरवाजात साडी अडकल्याने 35 वर्षीय महिलेचा मृत्यू)
लहान मुलांना या गोष्टी खेळण्यासाठी देऊ नका -
डॉक्टरांच्या मते, लहान मुलांना फुगे, बटन, सेल, हरभरा, वाटाणे किंवा नाणी यासारख्या गोष्टींपासून दूर ठेवणे गरजेचे आहे. केजीएमयूचे ईएनटी तज्ज्ञ डॉ. वीरेंद्र वर्मा आणि सिव्हिल हॉस्पिटलचे डॉ. पंकज श्रीवास्तव यांनी सांगितले की, अशा वस्तू मुलांच्या नाकात, घशात किंवा कानात अडकतात, ज्यामुळे त्यांच्या जिवाला धोका निर्माण होऊ शकतो. मुलांच्या सुरक्षेसाठी पालकांनी सतर्क राहणे आवश्यक आहे. कोणत्याही लहानशा निष्काळजीपणामुळे मोठा अपघात होऊ शकतो. मुलांना अशा गोष्टींपासून दूर ठेवणे आणि त्यांच्या खेळाच्या हालचालींवर लक्ष ठेवणे आवश्यक आहे.