हैंदराबाद येथील शादनगर परिसरात अन्नराम गावातील श्रीकांत या 39 वर्षीय व्यक्तीचा जेवताना चिकनचा तुकडा घशात अडकल्याने त्याचा मृत्यू झाला. श्रीकांत हैदराबादला त्याच्या बहिणीला भेटायला गेला होता आणि कोठी येथील एका बारमध्ये जेवण करत होता. चिकन बिर्याणी खाताना आणि दारूचे सेवन करत असताना चिकनचा तुकडा घशात अडकल्याने त्याचा श्वास कोंडला. झालल्या त्रासामुळे तो बारच्या बाहेर आला आणि रस्त्यावर कोसळला. स्थानिक रहिवाशांनी तातडीने पोलिसांना बोलावले. पोलिसांनी श्रीकांतला रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी त्यांना उपचारापूर्वीच मृत घोषित केले. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून घटनेचा तपास सुरू आहे. श्रीकांतचा मृतदेह शवविच्छेदन तपासणीसाठी उस्मानिया जनरल हॉस्पिटलच्या शवागारात नेण्यात आला असून शादनगर येथील त्याच्या कुटुंबीयांना या घटनेची माहिती देण्यात आली आहे.
एक्स पोस्ट
గొంతులో చికెన్ ముక్క ఇరుక్కుని ప్రాణం వదిలిన వ్యక్తి
హైదరాబాద్ - షాద్ నగర్ పరిధిలోని అన్నారం గ్రామానికి చెందిన శ్రీకాంత్(39) తన సోదరిని కలిసేందుకు వచ్చి కోఠిలోని ఓ వైన్స్లో మద్యం తాగి, చికెన్ బిర్యానీ తిన్నాడు.
తినే క్రమంలో గొంతులో చికెన్ ముక్క ఇరుక్కోవడంతో శ్వాస ఆడక రోడ్డు… pic.twitter.com/8CjU09qIdJ
— Telugu Scribe (@TeluguScribe) June 23, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)