Bhopal: हृदय हेलावून टाकणारी घटना! भोपाळ येथील रुग्णालयात कोरोनाबाधित महिलेवर बलात्कार; उपचारादरम्यान पीडितेचा मृत्यू
(संग्रहित प्रतिमा)

संपूर्ण देश कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत असताना मध्यप्रदेश (Madhya Pradesh) येथून हृदय हेलावून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. भोपाळच्या (Bhopal) मेमोरिअल हॉस्पिटल अॅण्ड रिसर्च सेंटरमध्ये (BMHRC) उपचार घेणाऱ्या एका महिलेवर वार्ड बॉयने बलात्कार (Rape) केला. त्यानंतर या महिलेची प्रकृती आणखी ढासळली आणि दुसऱ्या दिवशी उपचारादरम्यान या महिलेचा मृत्यू झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या घटनेला एक महिन्याहून अधिक काळ उलटल्यानंतर संबंधित महिलेच्या नातेवाईकांना कळवण्यात आला आहे. या घटनेनंतर पोलिसांनी वार्ड बॉयला अटक केली आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच संतापजनक वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत महिलेला कोरोनाची लागण झाली होती. ती मेमोरिअल हॉस्पिटल अॅण्ड रिसर्च सेंटरमध्ये उपचार घेत होती. दरम्यान, 6 एप्रिल रोजी आरोपी तिच्या जवळ आला. तसेच तिला मेडिकल तपासणी करण्यात सांगितले. त्यावेळी आरोपीने तपासणीच्या नावाखाली तिला बाथरूमध्ये नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. त्यानंतर या महिलेची प्रकृती आणखी खालावली. ज्यानंतर तिला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. परंतु, दुसऱ्याच दिवशी म्हणजे 7 एप्रिलला या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर सर्वत्र संतापजनक वातावरण निर्माण झाले आहे. तसेच या प्रकरणातील दोषीवर कडक कारवाई करण्याच्या मागणींने अधिक जोर धरला आहे. हे देखील वाचा- Corona Vaccine: कोरोना रुग्णांना Recovery नंतर 6 महिन्यांनी कोरोना लस देण्यात यावी; NTAGI ची शिफारस

या घटनेनंतर अनेक संघटना, संस्था आणि महिलेच्या नातेवाईकांकडून पोलिसांविरोधात आवाज उठवला जात आहे. यावर भोपाळचे महानिरीक्षक म्हणाले की, मृत महिलेवर 6 एप्रिल रोजी बलात्कार झाल्याची माहिती, वैद्यकीय प्रशासनाकडून मिळाली. त्यानंतर पोलिसांनी ताबडतोब गुन्हा दाखल केला करत आरोपीला अटक केली. तो आता तरूंगात आहे. तर, भोपाळ पोलीस हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत नाही, असे पोलीस उपमहानिरीक्षक म्हणाले आहेत.