Corona Vaccine: कोरोना रुग्णांना Recovery नंतर 6 महिन्यांनी कोरोना लस देण्यात यावी; NTAGI ची शिफारस
COVID-19 Vaccine | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

Corona Vaccine: केंद्र सरकारने लसीकरणासाठी गठित नॅशनल टेक्निकल अ‍ॅडव्हायझरी ग्रुपने (NTAGI) ने कोरोना लसीसंदर्भात अनेक शिफारशी केल्या आहेत. कोविशिल्डच्या दोन डोसमधील फरक 12-6 आठवड्यांपर्यंत वाढविला गेला पाहिजे आणि कोरोना पॉझिटिव्ह असणाऱ्यांना रिकव्हरीनंतर 6 महिन्यांनी कोरोना लस देण्यात यावी, अशी शिफारस एनटीएजीआयने केली आहे.

एनटीजीआयने असेही सुचवले आहे की, गर्भवती महिलांना कोणतीही कोरोना व्हॅक्सिन घेण्याचा पर्याय दिला जाऊ शकतो आणि प्रसूतीनंतर कोणत्याही वेळी स्तनपान करणाऱ्या महिलांना लस दिली जाऊ शकते. याबरोबरचं एनटीएजीआयने असेही म्हटले आहे की, कोरोना संक्रमित व्यक्तीने रिकव्हरीनंतर सहा महिन्यांपर्यंत कोरोना लसीकरण टाळावे. (वाचा - Bharat Biotech च्या Covaxin ला 2-18 वयोगटातील मुलांवर चाचणी करण्यास DCGI ची परवानगी)

कोरोना बाधित रूग्णांनी लसीचा डोस कधी घ्यावा? हा प्रश्न अनेकदा कोरोनाग्रस्त असलेल्या लोकांना पडला आहे. यासाठी सरकारी समितीने आपली शिफारस केली आहे. सरकारी समितीच्या म्हणण्यानुसार, कोरोना रूग्णांनी रिकव्हरीनंतर 6 महिन्यांनी लसचा पहिला डोस घ्यावा.

दरम्यान, भारत बायोटेकला 2 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांच्या लसींच्या दुसर्‍या क्लिनिकल चाचणीस मान्यता देण्यात आली आहे. ही मंजूरी ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने दिली आहे. कोरोना विषाणूची दुसरी लाट देशामध्ये विनाशकारी ठरत आहे. कोरोना इन्फेक्शनने सलग दुसर्‍या दिवशी 4 हजाराहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. कोविडमुळे होणाऱ्या मृत्यूच्या संख्येत सातत्याने वाढ झाल्याने भीतीचे वातावरण आहे.

देशभरातील रूग्णालयात वाढत्या कोरोना रूग्णांमुळे बेड, व्हेंटिलेटर, रिमोडवीर आणि ऑक्सिजनची कमतरता जाणवत आहे. शेकडो लोकांवर उपचार सुरू असून अनेकजण कोरोनाचा बळी ठरत आहेत. उत्तर प्रदेश, दिल्ली, महाराष्ट्र, मध्य प्रदेश यासह बर्‍याच राज्यात निर्बंध लादले गेलेले असूनही देशात दररोज साडेतीन लाखांहून नवीन कोरोना रुग्ण आढळत आहेत. गेल्या 24 तासांत 4,126 जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे.