बेंगळुरूच्या (Bangalore) अमृतहल्ली (Amritahalli) येथील एका मंदिरात एका महिलेला मारहाण करून ओढून नेण्यात आल्याची भीषण घटना घडली आहे. या घटनेचा एक व्हिडिओ इंटरनेटवर समोर आला आहे. ज्यामध्ये महिलेला कसे ओढले जात आहे. थप्पड मारली जात आहे. पीडित हेमावती यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना 21 डिसेंबर रोजी अमृतहल्ली परिसरातील लक्ष्मी नरसिंह स्वामी मंदिरात घडली. तिने मंदिराचे धर्मदर्शी मुनिकृष्णाविरुद्ध अमृतहल्ली पोलिस ठाण्यात तक्रारही दाखल केली आहे, असे पोलिसांनी शुक्रवारी सांगितले.
व्हिडिओमध्ये महिलेला वारंवार थप्पड मारण्यात आल्याचे, केसांना पकडून बाहेर ओढले जात असल्याचे दिसत आहे. ती झाकण्यासाठी धावत असताना आरोपी तिला काठीने मारहाण करण्याचा प्रयत्न करताना दिसतो. आरोपी मुनीकृष्णाविरुद्ध भादंवि कलम 354 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हेही वाचा Man Pulls Truck with Teeth: चक्क दातांनी ओढला तब्बल 15,730 किलो वजनाचा ट्रक; केला विश्वविक्रम (Watch)
पहा व्हिडिओ
This is from #Bengaluru, #Karnataka.
Dalit women Assaulted By Temple Administration Board Member, And Restrict Her to Entered Gods Darshan.
Victim Filed Complaints Against Accused at Amrtuhalli Police Station.#Bangalore #Amrtuhalli #Dalit #Casteism #DalitLivesMatter pic.twitter.com/OUnhdaXXcx
— Hate Detector ? (@HateDetectors) January 6, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)