Wipro Fired Employees: जगातील अनेक कंपन्यांमध्ये सध्या कर्मचारी कपात करण्यात येत आहे. ट्विटरवरून सुरू झालेली टाळेबंदीची प्रक्रिया गुगलपर्यंत पोहोचली आहे. गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या ई-मेलमध्ये alphabet.inc 12 हजार कर्मचाऱ्यांना नारळ दिला आहे. आता विप्रो या आयटी क्षेत्रातील प्रसिद्ध कंपनीने अंतर्गत चाचणीच्या आधारे 400 हून अधिक नवीन कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे.
कंपनीने सर्व बाधित कर्मचाऱ्यांना टर्मिनेशन लेटर जारी केले आहे. योग्य प्रशिक्षण असूनही ते कामगिरी करण्यात अपयशी ठरल्याचेही सांगण्यात आले. सूत्रांनी सांगितले की, टर्मिनेशन लेटरमध्ये असे सांगण्यात आले होते की, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणाच्या खर्चापोटी 75,000 रुपये द्यावे लागतील, जो कंपनीने त्यांच्यावर खर्च केला आहे. मात्र, रक्कम माफ केली जात आहे. (हेही वाचा - Google Alphabet Layoffs: Google ची मूळ कंपनी Alphabet जगभरातील 12 हजार कर्मचाऱ्यांना देणार नारळ)
पत्रात असे लिहिले आहे की, "आम्ही तुम्हाला कळवू इच्छितो की प्रशिक्षणाचा 75,000 रुपये जो तुम्ही भरण्यास जबाबदार आहात ते माफ केले जाईल." या संपूर्ण प्रकरणाविषयी बोलताना, आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनीच्या वतीने स्पष्ट करण्यात आले की, स्वत:ला सर्वोच्च दर्जा धारण करण्यात अभिमान वाटतो. प्रत्येक एंट्री लेव्हल कर्मचार्याने त्यांच्या नियुक्त केलेल्या कार्यक्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणे अपेक्षित आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून अनेक तंत्रज्ञान कंपन्यांमध्ये कर्मचारी कपात केली जात आहे. याचा परिणाम आयटी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांवर होत आहे. येत्या काळात जागतिक मंदीचं सावट अधिक गडद होण्याची शक्यता आहे.