गुगल (Photo Credit: Getty)

Google Alphabet Layoffs: Google ची मूळ कंपनी Alphabet Inc. 12,000 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकणार आहे. वृत्तसंस्था रॉयटर्सशी शेअर केलेल्या स्टाफ मेमोमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई (Sundar Pichai) यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. या कपातीमुळे तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना मोठा फटका बसला आहे. गुगलची प्रतिस्पर्धी मायक्रोसॉफ्ट कॉर्पने आधीच सांगितले होते की, कंपनी आपल्या 10,000 कर्मचाऱ्यांना काढून टाकणार आहे.

नोकऱ्या कपातीमुळे कंपनीतील सर्व टीमवर परिणाम होईल. यात कॉर्पोरेट ऑपरेशन्स तसेच अभियांत्रिकी आणि उत्पादन टीमचा समावेश आहे. वृत्तसंस्था रॉयटर्ससोबत शेअर केलेल्या स्टाफ मेमोमध्ये, कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई म्हणाले की, अल्फाबेट इंक 12,000 कर्मचाऱ्यांना काढून टाकत आहे. (हेही वाचा - ShareChat Layoffs: Twitter, Facebook नंतर आता शेअरचॅटने दिला 20 टक्के कर्मचाऱ्यांना नारळ)

गुगलने सांगितले की, या टाळेबंदीचा परिणाम आतापासून अमेरिकेसह जगभरातील कर्मचाऱ्यांवर होणार आहे. ही बातमी अशा वेळी आली आहे, जेव्हा तंत्रज्ञान क्षेत्र आर्थिक अडचणींचा सामना करत आहे आणि काही नवकल्पनांवर पुढे जात आहे. गुगल आणि मायक्रोसॉफ्ट अशा काही सॉफ्टवेअरवर गुंतवणूक करत आहेत, जे जनरेटिव्ह आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणून ओळखले जाते.

अल्फाबेटचे सीईओ सुंदर पिचाई यांनी एका नोटमध्ये म्हटले आहे की, “मला आमच्या ध्येयाची ताकद, आमची उत्पादने आणि सेवांचे मूल्य आणि AI मधील आमच्या सुरुवातीच्या गुंतवणुकीमुळे पुढे येणार्‍या मोठ्या संधीबद्दल खात्री आहे."