Photo Credit- X

Wayanad Landslide Update: केरळ येथे वायनाडमध्ये मंगळवारी मुसळधार पावसामुळे मोठी दुर्घटना घडली. भूस्खलन(Wayanad Landslide) झाल्याने 4 गावं मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडली गेली. या दुर्घटनेत आतापर्यंत 143 जणांचा मृत्यू झाला असून त्याची माहिती केरळ आरोग्य विभागाने (Kerala Health Department)दिली.  शेकडो लोक जखमी झाले आहेत. जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहे. अजूनही 200 पेक्षा अधिकजण बेपत्ता काल रात्री अंधारामुळे शोधमोहिम थांबवल्यानंतर सकाळी पुन्हा सर्च ऑपरेशन सुरू झाले आहे. (हेही वााचा:Weather Forecast for Tomorrow: कसे असेल महाराष्ट्र, दिल्ली, राजस्थानसह इतर राज्यात उद्याचे हवामान, जाणून घ्या )

अडकलेल्या लोकांची सुटका करण्यासाठी बचावकार्यात लष्कर, नौदल, एनडीआरएफ, राज्याचे आपत्ती निवारण दल, पोलिस, अग्निशमन दलाचे जवान सहभागी झाले आहेत. मेपाडी भागात भूस्खलन झाले असून याचा फटका मुंडक्की, चूरामाला आणि नूलपुळ्ळा या गावांनाही देखील बसला. त्यामुळे शेकडो लोक मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले. आतापर्यंत अनेकांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. मृतांमध्ये महिला आणि लहान मुलांची संख्या सर्वाधिक आहे. या घटनेनं संपूर्ण देश हादरला आहे.

या घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केलं. त्याचबरोबर जखमींवर तातडीने उपचार आणि सर्वतोपरी मदत करण्याच्या सूचना दिल्या आहेत. दुसरीकडे काँग्रेस नेते आणि लोकसभेचे विरोधीपक्षनेते राहुल गांधी यांनी देखील या घटनेवर दु:ख व्यक्त केलंय. राहुल गांधी आणि प्रियंका गांधी आज वायनाड येथे जाऊन नागरिकांची भेट घेणार होते. मात्र मुसळधार पावसामुळे त्यांनी आपला दौरा रद्द केला आहे.

पोस्ट पहा

आपत्तीग्रस्त भागांत शोधमोहिम आणि बचावकार्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. ढिगाऱ्याखाली अद्याप अनेकजण अडकल्याची शक्यता असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सतत येणाऱ्या पावसामुळे बचावपथकाला मदतकार्यात मोठे अडथळे येत आहेत. रात्री उशिरापर्यंत रेक्यू ऑपरेशन सुरू होतं.