
Viral Video: सोशल मीडिया इन्फ्लूएझरने रिल्स बनवण्यासाठी हद्दच पार केले आहे. व्हिडिओसाठी दिल्लीतील एका पूलावर व्हिडिओ शूट केला आहे. परंतु व्हिडिओ शूट करताना रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकुळ घालत आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे तसेच त्याच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. (हेही वाचा- पोलिसांसमोर स्टंटबाजी नडली, पुढचं चाक उचलून बाईक पळवली..
व्हिडिओत दिसल्याप्रमाणे, नवी दिल्लीतील पश्चिम विहार फ्लायओव्हरवर एक इसुझू डी मॅक्स एसयूव्ही पार्क केलेली दिसत आहे. उड्डाणपुलावर रस्त्याच्या मध्यभागी SUV पार्क केल्यानंतर दोन माणसे उतरताना दिसतात. इंस्टाग्राम रीलसाठी ते एसयूव्हीसमोर रिल्सस्टार पोज देताना दिसत आहेत. गाडी चालवताना एक जण कॅमेरासाठी पोज देताना उभा राहताना दिसतो. ही सर्व घटना पूलावर घडते.