Uttar Pradesh Crime: पैसे चोरल्याच्या संशयावरून विवस्त्र करून मुलाला बेदम मारहाण, घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने तिघांना अटक
Crime | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

Uttar Pradesh Crime: उत्तर प्रदेशातील फिरोजाबादमध्ये रस्त्याच्या कडेला असलेल्या एका चहाच्या स्टॉसमधून पैसे चोरल्याच्या संशआवरून एका १२ वर्षाच्या मुलाचे कपडे काढून मारहाण केल्या प्रकरणी तीघांना अटक करण्यात आली आहे. फिरोजाबाद शहराचे पोलिस अधिक्षक सर्वेश कुमार मिश्रा यांनी घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आरोपीवर कारवाई केली आहे. पोलीसांनी मुलाची सुटका केली आणि त्याच्यावर सद्या रुग्णालयात उपचार सुरु आहे. भररस्त्यात मुलाचे कपडे काढून खांब्याला बांधून मारहाण केली या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

पोलिसांनी घटनास्थळी जावून मुलाची सुटका केली. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मिळालेल्या माहितीनुसार मुलाने पैसे चोरल्याचा संशय आरोपीला आला होता. त्यामुळे मुलाला विवस्त्र करून बेदम मारहाण केली. यात त्याच्या पायावर आणि पाठीवर भरपूर जखमा झाल्या आहे. पोलीसांनी हा व्हिडिओ ऑनलाईन पाहिला. ही घटना कळताच त्यांनी घटनास्थळी जावून मुलाची सुटका केली. या प्रकरणात तीन जणांना अटक करण्यात आली.

आरोपीवर कठोर कारवाई केली जाणार असं पोलीसांनी माध्यमांना माहिती दिली. पुढील कारवाईसाठी त्यांनी चौकशी सुरु केली आहे. आरोपीवर POCSO कायद्यांतर्गतही गुन्हा दाखल केला जाईल. मुलाच्या आईने सांगितले की तिने घटनास्थळी धाव घेतली आणि आपल्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न केला. आईने सांगितल्या प्रमाणे मुलाकडे कोणतीही रक्कम सापडली नाही.