एकमेकांशी भांडण केल्यानंतर एक जोडपे त्यांच्या बाल्कनीची रेलिंग तोडून 25 फूट खाली फूटपाथवर पडले. या अपघाताचा व्हिडिओही समोर आला आहे. फुटेजमध्ये, 35 वर्षीय ओल्गा वोल्कोवा आणि येवगेनी कार्लागिन रशियातील सेंट पीटर्सबर्ग येथील त्यांच्या घराच्या तिसऱ्या मजल्यावरील बाल्कनीत भांडताना दिसत आहेत. वाद सुरू असताना ते बाल्कनीच्या रेलिंगला आदळले, त्यामुळे हे जोडपे खाली पडले.ही घटना तीन वर्षांपूर्वी घडली असली तरी अलीकडे त्याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. स्थानिक मीडिया रिपोर्ट्सनुसार, या जोडप्याला 'गंभीर' जखमा झालेल्या. त्यांचे दोन्ही हात व पाय मोडले होते.

पाहा व्हिडिओ -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)