
UP Shocker: हुंड्याच्या मागणीमुळे अनेक महिलांना सासरच्या मंडळींकडून छळाला सामोरे जावे लागते. असाच एक प्रकार हरदोई जिल्ह्यातील सहजनपूर गावातून समोर आला आहे. जिथे पतीने चक्क पत्नीची नाक कापली आहे. पत्नीच्या आई-वडिलांकडे 50 हजार रुपयांची मागणी केली होती. या कारणावरून आरोपीने पत्नीवर धारदार शस्त्राने वार करून तिचे नाक कापले.त्यानंतर ही महिला बेशुद्ध पडली. तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी पती सह अन्य एका महिलेविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये महिलेचे नाक कापल्याचे दिसत आहे.
ही घटना हरदोईच्या पाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सहजनपूर गावातील आहे. पीडित मुलीचे वडील मुनेश यांनी दिलेल्या माहितीनुसार, चार वर्षांपूर्वी विशाल नावाच्या तरुणाशी त्याने आपल्या मुलीचे लग्न लावून दिले होते. लग्नादरम्यान त्याने आपल्या साधनेनुसार हुंडाही दिला. मात्र, लग्नानंतर काही वेळातच दोघांमध्ये वाद सुरू झाला. काही दिवसांपूर्वी विशाल मद्यधुंद अवस्थेत घरी आला आणि त्याने आपल्या पत्नीशी वाद घातला आणि तिला मारहाण केली आणि धारदार शस्त्राने तिच्या नाकावर वार करून तिचे नाक कापले होते.