Kanpur Car Accident: कानपूर शहरातील किडवाई नगरमध्ये एक भीषण अपघात झाल्या ची माहिती समोर येते. शुक्रवारी दुपारी हा अपघात घडला. भरधाव कारची स्कूटरला धडक दिल्याने हा अपघात झाला. भरधाव कार अनियंत्रित झाल्याने स्कूटरला धडकली. या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला. तर तिची मुलगी गंभीर जखमी झाली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (हेही वाचा- गावात स्माशानभूमीची व्यवस्था नसल्याने पूराच्या पाण्यातून नागरिकांचा जीवघेणा प्रवास)
मिळालेल्या माहितीनुसार, महिला आपल्या १२ वर्षाच्या मुलीसह स्कूटरवरून जात होती. त्यावेळी एक कार वेगाने आली आणि अनियंत्रित होऊन स्कूटरला धडकली. ही धडक इतकी भीषण होती की, महिला आणि मुलगी दोघे ही ३० फुट फेकले गेले. ही घटना परिसरात लावण्यात आलेल्या सीसीवीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. धक्कादायक म्हणजे कार मध्ये अल्पवयीन मुले मुली होते. कार अल्पवयीन मुलगी चालवत होती.
पाहा व्हिडिओ
कानपुर में कार सवार नाबालिग स्टंटबाज ने स्कूटी को मारी टक्कर, महिला की मौके पर मौत बेटी गंभीर रूप से कोई घाय, किदवई नगर थाना क्षेत्र की घटना का सीसीटीवी वीडियो आया सामने।@dcpskanpur @kanpurnagarpol #Kanpur pic.twitter.com/Tr0PoOTluT
— Shyam Tiwari (@Shyamtiwariknp) August 3, 2024
अपघातानंतरची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिस घटनास्थळी दाखल झाले. या अपघातानंतर कार मालकाला आणि कार चालवत असलेल्या अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले. अल्पवयीन चालकाला पोलिसांनी अटक केले आहे. याप्रकरणी किडवाई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस या प्रकरणी अधिक चौकशी तपासणी करत आहे.
अपघात झाल्यानंतर स्थानिकांनी घटनास्थळी गर्दी केली. अपघातग्रस्त महिलेला आणि तिच्या मुलीला रुग्णालयात दाखल केले. महिलेने हेल्मेट घातले होते तरी देखील तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि तिचा मृत्यू झाला. मुलीच्या शरिरावर अनेक फ्रॅक्चेर आहेत. मुलीवर अद्याप उपचार सुरु आहे. व्हिडिओ व्हायरल होताच, अनेकांनी चालकावर संताप व्यक्त केला आहे.