Raigad Video: खालापूर तालुक्यातील आरकत वाडी आणि परिसरातील आदिवसी पाड्यांवर सोयीसुविधांचा अभाव असल्याने नागरिकांना काही कठीण गोष्टीचा सामाना करावा लागत आहे. परिसरात स्मशानभूमी नदीच्या दुसऱ्या काठावर असल्याने अंतिम संस्कार करताना नदी ओलांडून दुसऱ्या काठावर जावे लागत आहे. यासंदर्भात खासदार सुप्रिया सुळा यांनी मन सुन्न करणाऱ्या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर त्यांनी जिल्हाधिकारी रायगड प्रशासनला सकारात्मक कार्यवाही करण्यासाठी विनंती केली आहे. स्मशानभूमीची योग्य व्यवस्था केल्यास नागरिकांनी जीवाशी खेळ करावा लागणार नाही असं ही या पोस्टमध्ये लिहले आहे. रायगड जिल्ह्यात मुसळधार पाऊस असल्याने ठिकठिकाणी पूर परिस्थिती झाली आहे. पूर ओलांडून नागरिकांनी जीवा प्रवास केल्याचे व्हिडिओत दिसत आहे. (हेही वाचा-ताम्हिणी घाट 5 ऑगस्ट पर्यंत वाहतूकीसाठी बंद)
खालापूर तालुक्यातील आरकत वाडी आणि परिसरातील आदिवासी पाड्यांवर सोयीसुविधांचा अभाव आहे. येथे स्मशानभूमी नदीच्या दुसऱ्या काठावर असल्याने अंतिम संस्कार करताना नदी ओलांडून दुसऱ्या काठावर जावे लागते. येथे स्मशानभूमीची योग्य व्यवस्था केल्यास नागरीकांना जीवाशी खेळ करावा लागणार नाही.… pic.twitter.com/4cZcmCmrWo
— Supriya Sule (@supriya_sule) August 3, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)