Madhya Pradesh Suicide: बारावीच्या परिक्षेत निकाल लागल्यानंतर, मध्य प्रदेशातील बुरहानपूर आणि खरगोनमध्ये दोन विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. बुरहानपूरमधील खासगी शाळेतील बारावीच्या विद्यार्थ्यांने गळफास लावून घेतला. रितेश मुंडके (18) असं बुरहानपूर येथील तरुणाने आत्महत्या केली आहे. त्यानंतर खरगोन येथील विद्यार्थींनीने झाडाला लटकून आत्महत्या केली. आत्महत्यानंतर दोघांच्याही कुटुंबियांवर दुखाचा डोंगर कोसळला आहे. (हेही वाचा- जद(यु) नेते Saurabh Kumar यांची पाटणा येथे गोळ्या झाडून हत्या; राजकीय वर्तुळात खळबळ)
मिळालेल्या माहितीनुसार, माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी आणि बारावी बोर्डाच्या परिक्षेचे निकाल जाहीर केल्यानंतर बुधवारी रात्री रितेश त्याच्या कुटुंबियांनी रुममध्ये मृतावस्थेत आढळून आला. शाळेच्या संचालक यांनी सांगितले की, रितेश हुशार विद्यार्थी होता पण गणिताच्या पुरवणी परिक्षेमुळे तो निराश झाला असावा. त्याचा मोठा भाऊ शाळेत टॉपर होता, कदाचित त्याचा दबाव वाढल्याने त्याने टोकाचे पाऊल उचलले आहे. पोलिस या घटनेचा तपास करत आहे. त्याच्या रुममध्ये कोणतीही सुसाईट नोट सापडलेली नाही अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
त्यानंतर खरगोनमध्ये दुसऱ्यांदा नापास झाल्याने तरुणीने झाडाला लटकून आत्महत्या केली. बुधवारी रिझल्ट लागल्यानंतर गुरुवारी सकाळी मुलीने आत्महत्या केली. मुलीचा मृतदेह राजपुरा रोडवर सापडला. पोलिस या प्रकरणाला परीक्षेतील अपयश आल्यामुळे आत्महत्या केल्याचे संशय घेत आहे.या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहे. मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.