Saurabh Kumar Shot Dead in Patna: जनता दल (युनायटेड) पक्षाचे युवा नेते सौरभ कुमार यांच्यावर गोळीबार झाला आहे. राजधानी पाटणा येथे घडलेल्या गोळीबाराच्या या घटनेत त्यांचा मृत्यू झाला. ज्यामुळे बिहारच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. सौरभ कुमार हे नितीश कुमार (Nitish Kumar) यांच्या पक्षाच्या (JD(U)) वतीने आयोजित कार्यक्रमावरुन परतत असताना त्यांच्यावर हल्ला झाला. हल्लोखोरांनी केलेल्या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले. या वेळी त्यांच्यासोबत असलेले मुनमुन यादेखील गंभीर जखमी झाल्या.
दुचाकीवरुन आलेल्या चार हल्लेखोरांकडून गोळीबार
एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, एकूण हल्लेखोर चार पुरुष होते आणि ते दुचाकीवरुन आले होते. त्यांनी सुरुवातीला सुरुवातीला जेडी(यु) नेत्या मुनमुन यांना लक्ष्य केले. त्यांनी आपल्या बंदुकीतून अनेक गोळ्या झाडल्या. त्यापैकी काही मुनमुन यांना लागल्या. मात्र, त्यातील दोन गोळ्या कुमार यांच्या डोक्याला लागल्या. ज्यामुळे ते गंभीर जखमी झाले. त्यांना जवळच्या रुग्णालयात वैद्यकीय उपचारांसाठी दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना तत्पूर्वीच मृत घोषीत केले. दरम्यान, मुनमुन यांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. (हेही वाचा, Lok Sabha Election 2024: मतदारांसाठी मोफत डोसे, बिअर, ऑटो राइड तसेच बर्गर, विमान तिकिटांवर सवलत; मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी खास ऑफर्स)
स्थानिक पातळीवर प्रचंड संताप
राजकीय नेत्यावर झालेल्या गोळीबाराच्या या घटनेमुळे स्थानिक पातळीवर प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. आक्रमक झालेल्या जद (यु) कार्यकर्त्यांकडून परिसरात परिसरात निदर्शने आणि रास्ता रोको करण्यात आला. हा हल्ला आणि हत्येसाठी जबाबदार असलेल्या गुन्हेगारांना तातडीने पकडण्यात यावे अशी मागणी आंदोलक करत आहेत. दुसऱ्या बाजूला पाटणा पोलिसांनी घटनेची नोंद घेऊन तपास सुरु केला आहे. (हेही वाचा: EVMs and VVPAT Cross-Verification: ईव्हीएमच्या कार्यपद्धीवर अनेक शंका; सर्वोच्च न्यायालयाकडून निवडणूक आयोगावर प्रश्नांची सरबत्ती)
तणावपूर्ण वातावरणात निवडणूक प्रचार सुरुच
दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू असतानाच बिहारमधील राजकीय आखाड्यात रक्तरंजीत घटना घडली आहे. कुमार यांच्या निधनानंतर वातावरण संतप्त असले तरी, निवडणूक प्रचार मात्र जोरदार सुरु आहे. राजकीय पक्षांकडून आणि नेत्यांकडून निवडणूक रॅली आणि प्रमुख नेत्यांची भाषणे सुरू आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूर्णिया येथील रॅलीला संबोधित करताना, राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (NDA) प्रदेशाप्रतीच्या बांधिलकीवर जोर दिला. दरम्यान, अशाच एका निवडणूक प्रचार कार्यक्रमात, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बिहारच्या भागलपूर मतदारसंघात त्यांच्या पहिल्या निवडणुकीच्या सभेला संबोधित केले आणि पक्षाचे तळागाळातील प्रचारावर लक्ष केंद्रित केले.
एक्स पोस्ट
#NewsAlert | JD(U) leader Saurabh Kumar shot dead in Patna
— NDTV (@ndtv) April 25, 2024
निवडणुकांमध्ये अशा प्रकारे राजकीय नेत्याची हत्या होणे हे अत्यंत गंभीर मानले जात आहे. या हत्या प्रकरणाचा निवडणुकीत राजकीय वापरही केला जात आहे. आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत.