EVMs and VVPAT Cross-Verification : लोकसभा निवडणूक (Lok Sabha Election)काळात मतदान प्रक्रियेवेळी काही गैरप्रकार होऊ नये यासाठी सुप्रीम कोर्टाने मतदान प्रक्रियेत लक्ष घालण्याचा निर्णय घेतला आहे. त्या पार्श्वभूमीवर दुपारी दोन वाजता सुप्रिम कोर्टाने निवडणूक अधिकाऱ्यांना बोलावले(EVMs and VVPAT Cross-Verification) आहे. त्यासाठी कोर्टाकडून काही प्रश्नांची लिस्ट तयार करण्यात आली आहे, जे निवडणूक अधिकाऱ्यांना विचारण्यात येणार आहे. 'निवडणूक काळात आम्ही चुकीच्या घटना होऊ इच्छित नाही. म्हणून आम्ही स्पष्टीकरण मिळविण्याचा विचार केला,' असे न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती दीपंकर दत्ता यांच्या खंडपीठाने सांगितले आहे. वरिष्ठ उपनिवडणूक आयुक्त नितेश कुमार व्यास यांना दुपारी २ वाजता बोलावण्यात आले आहे. व्यास यांनी यापूर्वी ईव्हीएमच्या कार्यपद्धतीबाबत न्यायालयात सादरीकरण दिले होते.
न्यायालयाने प्रश्न उपस्थित करताना सोर्स कोड आणि प्रोग्राम हा वन टाइम असतो का? प्रोग्राम लोड झाल्यानंतर हा प्रोग्राम कोणत्या युनिटमध्ये होतो? व्हीव्हीपॅट की इव्हीएम मशीनमध्ये होतो? इव्हीएम स्टोरेज ४५ दिवस स्टोरेज असतं, यात वाढ होऊ शकते का? असे प्रश्न न्यायाधीशांनी उपस्थित केले आहेत. त्याशिवाय, प्रोग्राम मायक्रोकंट्रोलरमध्ये फक्त एकदाच फीड केला जाऊ शकतो का? इलेक्शन कमिशनकडे किती सिम्बॅाल लोडिंग युनिट्स उपलब्ध आहेत? कंट्रोल युनिटसह VVPAT मशीन सीलबंद आहे का? या प्रश्नांचा खुलासा करण्यास कोर्टाने आयोगाला सांगितला (supreme court on evm vvpat) आहे.
१८ तारखेला पार पडलेल्या एका सुनावणी दरम्यान, ॲड सिद्धार्थ शिंदे यांनी निर्णय राखून ठेवला होता. या प्रकरणावर ॲड सिद्धार्थ शिंदे म्हणाले की, सुप्रीम कोर्टानं निर्णय राखून ठेवला होता. आज साडेदहा वाजता सुरू झालेल्या सुनावणी वेळी निवडणूक आयोगाचे अधिकारी उपस्थित नसल्याने आज २ वाजता निवडणूक अधिकाऱ्यांना बोलवले आहे.