#TumKabAaoge: ‘व्हॅलेंटाईन डे’साठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्राद्वारे आमंत्रण
#TumKabAaoge Shaheen Bagh protesters invite PM Modi (PC - Twitter)

#TumKabAaoge: आज संपूर्ण देशात 'व्हॅलेंटाईन डे' (Valentine Day) साजरा करण्यात येत आहे. आज अनेक जोडपे आपल्या जोडीदाराबरोबर हा दिवस साजरा करत असतात. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनाही एका पत्राद्वारे 'व्हॅलेंटाईन डे'चं आमंत्रण देण्यात आलं आहे. या पत्रामध्ये 'तुम कब आओगे', असं लिहण्यात आलं आहे. सध्या या आमंत्रण पत्राची राजकीय वर्तुळात जोरजार चर्चा सुरू आहे.

आता तुम्हालाही प्रश्न पडला असले, की पंतप्रधानांना हे पत्र कोणी पाठवलं असेल? सुधारित नागरिकत्व कायाद्याविरोधात दिल्लीतील शाहीनबाग येथे आंदोलन करणाऱ्या महिलांनी मोदींना हे आमंत्रण दिलं आहे. या पत्रात या महिलांनी शुक्रवारी 'व्हॅलेंटाईन डे' निमित्त मोदींनी शाहीनबाग येथे येऊन आमच्याबरोबर प्रेमाचा दिवस साजरा करावा, असं म्हटलं आहे. सुधारित नागरिकत्व कायदा मागे घेण्यात यावा या मागणीसाठी गेल्या काही दिवसांपासून शाहीन बागमधील महिला आंदोलनाला बसल्या आहेत. या पत्रात या महिलांनी 'पंतप्रधान मोदी, कृपया शाहीन बागेत या तुमची भेटवस्तू घ्या आणि आमच्याशी बोला', असंही म्हटलं आहे. 'व्हॅलेंटाईन डे'निमित्त या महिलांनी मोदींसाठी प्रेमगीत सादर करुन एक खास ‘सरप्राइज’ भेटवस्तूही दिली. सध्या सोशल मीडियावर या सर्व महिलांचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. (हेही वाचा - गुजरात: भूज मधील मुलींच्या कॉलेजमध्ये वसतिगृहाच्या वॉर्डनच्या तक्रारीवरून मुलींची अंतवस्त्र उतरवली; मासिकपाळी दरम्यान मंदिर आणि किचनमध्ये प्रवेश केल्याचा आरोप)

ट्विटरवर सध्या #TumKabAaoge, #ModiTumKabAaoge हे हॅशटग ट्रेण्ड होत आहेत. अनेकांनी हा हॅशटॅग वापरुन मोदींना शाहीनबागेत येण्याचे आवाहन केलं आहे. गुरुवारीर रात्री शाहीन बागेतील आंदोलकांनी 'मोदी तूम कब आओगे', अशा घोषणाही दिल्या. गेल्या दोन महिन्यांपासून हे शाहीन बागेत आंदोलन सुरू आहे. त्यामुळे आपलं म्हणणं पंतप्रधानांपर्यंत पोहचावे यासाठी या महिलांनी हे पत्र पाठवलं आहे.