Train Accident In Burhanpur: इयरफोन लावून रेल्वे ट्रॅकवरून चालणं दोन मुलांना पडलं महागात; ट्रेनच्या धडकेत शरीराचे झाले 50 हून अधिक तुकडे
Railway Track Representational Image (PC -Pixabay)

Train Accident In Burhanpur: मध्य प्रदेशमधील बुरहानपूर (Burhanpur) जिल्ह्याच्या रेल्वे ट्रॅकवर कर्नाटक एक्स्प्रेसच्या धडकेत दोन मुलांचा मृत्यू झाला. या अपघातात दोन्ही मुलांच्या शरीराचे 50 ते 60 तुकडे झाले. तसेच सुमारे 100 मीटर अंतरावर या दोघांच्या शरीराचे चिथडे उडाले. या घटनेनंतर शेकडो संतप्त लोक ट्रॅकवर पोहोचले. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने तीन गाड्या अर्ध्या तासासाठी वाघोडामध्ये उभ्या करण्यात आल्या. शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता बुरहानपूर येथील बडोदा येथील रहिवासी असलेला 19 वर्षीय इरफान आणि 16 वर्षीय कलीम हे ट्रॅकवरून बुरहानपूरकडे येत होते. थोड्या वेळानंतर कर्नाटक एक्स्प्रेस भुसावळहून लालबाग रेल्वे स्थानकाकडे येत होती. रेल्वे ट्रॅक पोल नंबर 496/2 ते 496/4 दरम्यान दोघांचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाला. यात या दोघांच्या शरीराचे तुकडे-तुकडे झाले. लालबाग रेल्वे स्थानक गाठताचं कर्नाटक एक्स्प्रेसच्या चालकाने अधिकाऱ्यांना अपघाताची माहिती दिली. अधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या माहितीत ड्रायव्हरने सांगितले की, दोन्ही मुले रुळावरून चालत होती. हॉर्न वाजवल्यानंतरही हे दोघे रुळावरुन खाली उतरले नाही. यामुळे दोघेही रेल्वे अपघाताचे बळी पडले. (हेही वाचा - Delhi: दिल्लीत 98 टक्के बलात्काराच्या प्रकरणांमध्ये आरोपी पिडीतेचे नातवाईक किंवा जवळचे परिचित- Police)

दरम्यान, या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. ही बातमी समजताचं मृतांची ओळख पटविण्यासाठी गावकरी रुळावर पोहोचले. मात्र, ग्रामस्थ व पोलिसांना केवळ दोन धड मिळाले. अपघातात मृत्यू झालेल्या दोघांच्या शरीराचे चिथडे उडाले होते. ट्रेनच्या धडकीमुळे शरीराचे बरेच तुकडे झाले. त्यामुळे पोलिसांना तसेच नागरिकांना चेहरा ओळखणेही कठीण झाले. पोलिसांसह सुमारे 40 जणांनी मृतांचे मृतदेह शोधण्यासाठी दोन तास ट्रॅकवर घालवले. यावेळी गोदानसह तीन गाड्या वाघोडा येथे अर्धा तास थांबवण्यात आल्या. सायंकाळी सातच्या सुमारास पुन्हा गाड्यांची वाहतूक रुळावर सुरू झाली.

या अपघातात मृत्यू झालेला कलीम हा इयत्ता 12 वीचा विद्यार्थी होता आणि इरफान मजूर म्हणून काम करत होता. यावेळी गावकऱ्यांनी सांगितले की, बहुतेक लोक शौचासाठी रुळावरुन जातात. बहुधा कलीम आणि इरफानसुद्धा शौचास गेले असावेत. पोलिसांनी रात्री उशिरा मृतदेहाचे काही भाग जिल्हा रुग्णालयात पाठवले. (हेही वाचा - Coronavirus Vaccine Update: भारतात 2024 पर्यंत प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहचणार कोरोनाची लस-SII)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघाताचे कारण समजू शकले नाही. या घटनेचा अधिक तपास करण्यात येत आहे. मृतदेहाचे भाग गोळा करण्यात आले आहेत. आज या दोघांच्या मृतदेहाचे उर्वरित तुकडे गोळा करण्यात येतील, असंही पोलिसांनी म्हटलं आहे.