PM Modi Security Breach: पंतप्रधानाच्या सुरक्षा प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज होणार सुनावणी
PM Narendra Modi's convoy | (Photo Credit - Twitter)

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या पंजाब दौऱ्यात (Punjab Tour) सुरक्षा प्रकरणी त्रुटी (Security Breach) झाल्याबद्दल शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) सुनावणी होणार आहे. सरन्यायाधीश एनव्ही रमणा, (N. V. Ramana) न्यायमूर्ती सूर्यकांत (Justice Surya Kant) आणि न्यायमूर्ती हिमा कोहली (Hima Kohli) यांच्या खंडपीठाने गुरुवारी ज्येष्ठ वकील मनिंदर सिंग यांच्या याचिकेची दखल घेतली की, बुधवारी पंजाबमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेत गंभीर त्रुटी आढळल्या. ज्या पंतप्रधान मोदींना पंजाबमधील सभेला न जाताच दिल्लीला परतावे लागले. याचिकेत त्यांनी सुरक्षा भंगाची सखोल चौकशी, पंजाब डीजीपी आणि मुख्य सचिवांना बडतर्फ करण्याची मागणी केली आहे. यासोबतच भटिंडा जिल्हा न्यायाधीशांना पंतप्रधानांच्या भेटीसाठी पोलिस बंदोबस्ताशी संबंधित सर्व पुरावे ताब्यात घेण्यास सांगण्यात आले आहे.

पंतप्रधानानच्या सुरक्षेबाबत गृहमंत्रालय  गंभीर

दुसरीकडे, गृह मंत्रालयाने याप्रकरणी चौकशी समिती स्थापन केली आहे. या तीन सदस्यीय समितीचे अध्यक्ष सुधीर कुमार सक्सेना, सचिव (सुरक्षा), कॅबिनेट सचिवालय असतील. त्यांच्यासोबत आयबीचे सहसंचालक बलबीर सिंग आणि एस सुरेश एसपीजी यांचाही चौकशी समितीमध्ये समावेश करण्यात आला आहे. समितीला लवकरात लवकर अहवाल सादर करण्याची सूचना करण्यात आली आहे. गृह मंत्रालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंजाबमधील दौऱ्यात ज्या पद्धतीने त्यांची सुरक्षा ढासळली, त्याबाबत गृहमंत्रालय अत्यंत गंभीर आहे.

राजकारण तापले

बुधवारी झालेल्या या प्रकरणानंतर राजकारण तापू लागले आहे. अनेक नेते दिग्जांनी पंतप्रधानांनच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली तसेत तीव्र शब्दात प्रतिक्रिया ही दिल्या. दरम्यान काँग्रेस-भाजपमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. काँग्रेसने घातपात करण्याचा कट आखला होता असा गंभीर आरोप भाजपने केला. तर, पंतप्रधानांचा दौरा रद्द करण्यामागे निदर्शकांचे कारण नसून मोदींच्या सभेतील मोकळ्या खुर्च्या आहेत असा पलटवार काँग्रेसनेही केला.

नेमंक काय होत प्रकरण?

पंतप्रधान राष्ट्रीय शहीद स्मारकावर पोहोचून प्रकल्पांचे उद्घाटन करणार होते. त्यासाठी ते हेलिकॉप्टरने जाणार होते, मात्र खराब हवामानामुळे त्यांनी रस्त्याने जाण्याचे ठरले. त्यानंतर मार्गात आंदोलन झाल्याने रास्ता रोको करण्यात आला, त्यामुळे पंतप्रधानांचा ताफा उड्डाणपुलावर 15-20 मिनिटे अडकून पडला होता. ही अत्यंत धोक्याची बाब आहे कारण 2021 मध्ये पाकिस्तानला लागून असलेल्या पंजाबच्या सीमेवर ड्रोन पाहण्याच्या 150 घटनांची नोंद झाली आहे. अनेक ड्रोनमध्ये बॉम्ब, ग्रेनेड, पिस्तूल यांसारखी शस्त्रे भरलेली असतात, त्यावर कुठेही हल्ला करता येतो.