Mukhtar Abbas Naqvi, Hajj Pilgrimage (PC - Wikimedia Commons and PTI)

Hajj Pilgrimage 2021: केंद्रीय अल्पसंख्यांक कार्यमंत्री मुख्तार अब्बास नकवी (Mukhtar Abbas Naqvi ) यांनी हज 2021 (Hajj Pilgrimage) यात्रा कोरोनाशी (Coronavirus) संबंधित राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मार्गदर्शक सूचनांवर अवलंबून असेल, असं स्पष्ट केलं आहे. लोकांच्या सुरक्षेला प्राधान्य देऊन पुढील वर्षी हजबाबत अंतिम निर्णय घेण्यात येईल. तसेच हज 2021 मध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणाऱ्या आढावा बैठकीनंतर हजच्या अर्जाची तयारी सुरू केली जाईल, असंही मुख्तार अब्बास नकवी यांनी सांगितलं आहे.

पुढील हज यात्रा जून-जुलैमध्ये होणार आहे. परंतु, कोरोना संदर्भातील मार्गदर्शक सूचनांनंतर अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. सौदी अरेबिया सरकारच्या वतीने हज संदर्भात निर्णय घेतल्यानंतर अर्ज आणि इतर प्रक्रियेसंदर्भात औपचारिक घोषणा केली जाईल, असंही मुख्तार अब्बास नकवी यांनी सांगितलं आहे. (हेही वाचा - Uber Mask Verification Selfie: कॅबने प्रवास करणार्‍यांसाठी मोठी बातमी; उबरने लाँच केले नवे फीचर, मास्कवाला सेल्फी पाठवणे बंधनकारक)

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवरील मार्गदर्शक सूचनांमुळे हजची व्यवस्था बदलू शकते. संपूर्ण हज प्रक्रियेमध्ये भारत आणि सौदी अरेबियामध्ये राहण्याची व्यवस्था, वाहतूक, आरोग्य आणि इतर सुविधांशी संबंधित मार्गदर्शक तत्त्वांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण बदल होण्याची शक्यता असल्याचंही नकवी यांनी सांगितलं आहे. (वाचा - UK Sex Ban: Covid-19 चा संसर्ग रोखण्यासाठी युके सरकारच्या नव्या नियमावली मध्ये सेक्स बॅन; जोडप्यांसाठी कडक नियम)

कोरोनामुळे हज यात्रेकरूंची सुरक्षा ही सरकारची प्राथमिकता आहे. भारत सरकार आणि इतर संबंधित संस्था या दिशेने आवश्यक व्यवस्था करतील. कोरोना साथीच्या आजारामुळे हज 2020 यात्रेमध्ये न गेलेल्या 1 लाख 23 हजार लोकांचे 2100 कोटी डीबीटीमार्फत कोणत्याही कपातीशिवाय परत करण्यात आले आहेत. तसेच सौदी अरेबियाच्या सरकारने 2018-19 साठी हज यात्रेकरूंच्या रहदारीचे सुमारे 100 कोटी रुपये परत केले आहेत, असंही मुख्तार अब्बास नकवी यांनी सांगितलं आहे.