Kerala Shocker: प्रियकराच्या घरात पुरलेल्या अवस्थेत आढळला बेपत्ता महिलेचा मृतदेह
Crime Scene | Representational Image | (Photo Credits: PTI)

केरळच्या (Kerala) इडुक्की (Idukki) जिल्ह्यातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. 15 ऑगस्ट रोजी बेपत्ता असलेल्या महिलेचा मृतदेह तिच्या प्रियकराच्या स्वयंपाकघरात 6 फूट खाली पुरलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे. मृत महिला आपल्या पतीपासून विभक्त झाली असून गेल्या 4 वर्षांपासून ती आपल्या प्रियकरासोबत राहत होती. संबंधित महिला बेपत्ता असल्याची तक्रार तिच्या नातेवाईकांनी स्थानिक पोलीस ठाण्यात दिली होती. त्यानंतर पोलिसांनी तिचा शोध घेण्यास सुरुवात केली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, सिंधु असे मृत महिलेचे नाव आहे. सिंधु ही पतीपासून विभक्त झाली असून गेल्या 4 वर्षांपासून ती आपला प्रियकर बिनॉयसोबत राहत होती. त्यांच्यासोबत बिनॉयचा 12 वर्षाचा मुलगा देखील राहत होता. दरम्यान, बिनॉय 10 ऑगस्ट रोजी त्याच्या मुलाला घेऊन त्यांच्या नातेवाईकांकडे गेला होता. मात्र, एकटाच माघारी परतला. त्यानंतर 11 ऑगस्ट रोजी सिंधूने तिच्या मुलीला फोन केला. तसेच बिनॉयकडून तिचा छळ होत असल्याची माहिती सिंधूनी तिला दिली. त्यानंतर 14 ऑगस्ट रोजी बिनॉयचा मुलगा घरी परतला, त्यावेळी सिंधू घरात नव्हती. हे त्याने नातेवाईकांना सांगितले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी नातेवाईकांनी सिंधू बेपत्ता असल्याची तक्रार स्थानिक पोलीस ठाण्यात दाखल केली. त्यावेळी घरातील स्वयंपाकघर दुसऱ्यांदा बनवण्यात आले आहे, असे बिनॉयच्या मुलाने पोलिसांना सांगितले. परंतु, पोलिसांनी त्याच्या बोलण्याला फारसे महत्व दिले नाही. परंतु, बिनॉय गायब असल्याने पोलिसांना संशय आला आणि स्वयंपाकघर खोदण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी स्वयंपाकघराच्या 6 फूट खाली पोलिसांना सिंधूचा मृतदेह पुरलेल्या अवस्थेत आढळून आला. हे देखील वाचा- Rajasthan Rape Case: जयपूरमध्ये पैसे देण्याच्या बहाण्याने 42 वर्षीय महिलेवर केला बलात्कार, फरार आरोपीचा पोलिसांकडून शोध सुरू

सिंधू यांचा मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांनी उत्खनन थांबवले. त्यानंतर शनिवारी सकाळी पोलीस कर्मचारी फॉरेन्सिक तज्ज्ञांसह परतले आणि मृतदेह बाहेर काढला. सिंधू यांचा मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी कोट्टायम वैद्यकीय महाविद्यालयात नेण्यात येणार आहे. बिनॉय हा बेपत्ता असून पोलीस त्याच्याही शोध घेत आहेत.