Terrorist killing of bank manager प्रतिकात्मक फोटो (PC - ANI)

Bank Manager Shot by Terrorists: जम्मू-काश्मीरमध्ये टार्गेट किलिंगच्या घटना थांबण्याचे नाव घेत नाहीत. दहशतवाद्यांनी (Terrorist) आता बँकेत घुसून मॅनेजर विजय कुमारची गोळ्या झाडून हत्या केली. हल्ल्यानंतर विजय कुमार (Vijay Kumar) यांना रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. मंगळवारीच कुलगाममध्येच दहशतवाद्यांनी सरकारी शाळेतील शिक्षिका रजनी बाला यांची गोळ्या झाडून हत्या केली.

यापूर्वी बडगाममध्ये तहसील आवारात घुसून कर्मचारी राहुल भट यांची हत्या करण्यात आली होती. तेव्हापासून काश्मिरी पंडितांचे आंदोलन सुरू असून ते स्वत:ची सुरक्षा स्वत:ची व्यवस्था करण्याची मागणी करत आहेत. बँक मॅनेजरची अशा प्रकारे हत्या केल्यानंतर काश्मीर खोऱ्यातील स्थानिक हिंदू अल्पसंख्याक आणि स्थलांतरित लोकांमध्ये भीतीचे वातावरण वाढले आहे. या वर्षाच्या सुरुवातीपासून टार्गेट किलिंगच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. एखाद्या नागरिकाची किंवा कर्मचाऱ्याची अशा प्रकारे हत्या झाल्याची गेल्या 5 महिन्यांतील ही 17वी घटना आहे. बुधवारीच जम्मू-काश्मीर प्रशासनाने हिंदू आणि शीखांना सुरक्षित ठिकाणी पोस्टिंग देण्याचे बोलले होते, मात्र आता या प्रकरणाने चिंता वाढवली आहे. वास्तविक, बँकेत घुसून खून करण्याच्या या प्रकारामुळे परप्रांतीय आणि अल्पसंख्याक कुठे सुरक्षित आहेत, असा प्रश्न निर्माण झाला आहे. (हेही वाचा - Self-Marriage: तरुणीचे स्वत:सोबतच लग्न, गुजरातमधील क्षमा बिंदू हिच्यामुळे समाजात नवा ट्रेण्ड? नवऱ्याशिवाय बोहल्यावर चढणाऱ्या मुलीची ही कहाणी)

या हत्याकांडानंतर जम्मू विभागात निदर्शने सुरू झाली असून सरकारला काही उपाय शोधावे लागतील असे लोकांचे म्हणणे आहे. एवढेच नाही तर सरकार सुरक्षित पोस्टिंगबद्दल बोलत आहे. पण काश्मीरमधील कोणतीही जागा आमच्यासाठी सुरक्षित नाही. जम्मूमध्ये सरकारी कर्मचारी रस्त्यावर उतरले असून त्यांना त्यांच्या जिल्ह्यातच पोस्टिंग देण्यात यावी, अशी मागणी येथील कर्मचाऱ्यांनी केली आहे. (हेही वाचा -

प्रसारमाध्यमांशी बोलताना काही आंदोलकांनी सांगितले की, प्रशासन म्हणते की काश्मीरच्या जिल्हा मुख्यालयात हिंदूंना पोस्टिंग दिली जाईल. परंतु, सध्या कोणतीही जागा सुरक्षित नाही. आमची मागणी आहे की, आम्हाला जम्मू विभागाबाहेर पाठवू नका आणि आमच्या जिल्ह्यातच पोस्टिंग करण्याचा प्रयत्न करावा.