Self-Marriage: तरुणीचे स्वत:सोबतच लग्न, गुजरातमधील क्षमा बिंदू हिच्यामुळे समाजात नवा ट्रेण्ड? नवऱ्याशिवाय बोहल्यावर चढणाऱ्या मुलीची ही कहाणी

गुजरात येथील वडोधरा येथे मात्र काहीसे वेगळेच घडते आहे. येथील क्षमा बिंदू (Kshama Bindu) ही 24 वर्षांची तरुणी विवाहबद्ध होते आहे. धक्कादायक असे की ही तरुणी विवाहबद्ध तर होते आहे पण स्वत:शी. ऐकून धक्का बसला ना? होय, ही तरुणी स्वत:सोबत विवाह ( Self-Marriage) करत आहे.

Self-Marriage: तरुणीचे स्वत:सोबतच लग्न, गुजरातमधील क्षमा बिंदू हिच्यामुळे समाजात नवा ट्रेण्ड? नवऱ्याशिवाय बोहल्यावर चढणाऱ्या मुलीची ही कहाणी
Indian Marriage | Representational Image (Photo Credits: Pixabay)

ऐकावे ते नवलच. आजवर आपण अनेक विवाह (Marriage) पाहिले असतील. ज्यात वर-वधू म्हणजेच नवरा-नवरी नटून थटून येतात एकमेकांना जाहीरपणे वरमाला घालतात आणि विवाहबद्ध होतात. गुजरात येथील वडोधरा येथे मात्र काहीसे वेगळेच घडते आहे. येथील क्षमा बिंदू (Kshama Bindu) ही 24 वर्षांची तरुणी विवाहबद्ध होते आहे. धक्कादायक असे की ही तरुणी विवाहबद्ध तर होते आहे पण स्वत:शी. ऐकून धक्का बसला ना? होय, ही तरुणी स्वत:सोबत विवाह ( Self-Marriage) करत आहे.

क्षमा बिंदू हिचा विवाह 11 जून रोजी पार पडतो आहे. त्यासाठी विवाहाचा हॉल, स्टेज, सजावट सगळे काही तयार आहे. फक्त एका गोष्टीची कमी आहे. ती म्हणजे नवरदेवाची. क्षमा स्वत:सोबत विवाहबद्ध होणार असल्यामुळे अर्थातच तिथे नवरदेव नसणार हे उघडच आहे. या लग्नाची मात्र समाज आणि प्रसारमाध्यमांमध्ये जोरदार चर्चा सुरु आहे.

सांगितले जात आहे की, हा विवाह पारंपरिक पद्धतीने पार पडणार आहे. ज्यात फेरे, सिंदूर आणि इतर अनेक पारंपरा पाळल्या जातील. अपवाद फक्त नवरदेव आणि वरातीचा असणार आहे. जसे या लग्नात नवरदेव नसणार आहे तसाच या लग्नाची वरातही निघणार नाही. गुजरातमधील हा बहुदा पहिलाच स्व-विवाह असावा.

क्षमा बिंदू हिने प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, मला लग्न करायचे होते परंतू कधीही नवरी किंवा वधू व्हायचे नव्हते. मला कोणाचीही पत्नी व्हायचे नव्हते. त्यामुळे मी स्वत:सोबतच विवाह करण्याचा निर्णय घेतला. कदाचित अशा प्रकारे विवाह करणारी मी पहिलीच व्यक्ती असेल, असा दावाही क्षमा बिंदू यांनी केला आहे. टाईम्स ऑफ इंडियाने याबाबत वृत्त दिले आहे.

क्षमा बिंदू आपल्या विवाहाबद्धल अधिक विस्ताराने बोलताना सांगितले की, स्वत:सोबत लग्न करणे म्हणजे कोणत्याही बंधनात किंवा जबाबदारीत न अडकणे होय. या मध्ये केवळ स्वत:वरच प्रेम आणि प्रेम करत राहणेच आहे. स्वत:ला स्वीकारणे आहे. माझे स्वत:वर प्रेम आहे. त्यामुळेच मी हे धाडस करु शकले असेही ही तरुणी सांगते.

आपले आई-वडील स्वतंत्र विचारांचे आहेत. त्यांचा आपल्याला पाठिंबा आहे. समाजात काही लोकांना कदाचित हे विचित्र वाटू शकते. पण त्याने काही फरक पडत नाही. मी लग्नानंतर दोन दिवसांचा हनिमून प्लानही तयार केला आहे. त्यासाठी मी गोव्याला जाणार असल्याचेही ती म्हणाले.

(The above story first appeared on LatestLY on Jun 02, 2022 10:16 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).