Photo Credit- X

Jammu Kashmir Terrorist Attack: दक्षिण काश्मीरमधील कुलगाम (Kulgam) जिल्ह्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात (Terrorist Attack) एका माजी सैनिकाचा मृत्यू झाला. तर त्याची पत्नी आणि मुलगी जखमी झाली आहे. दहशतवाद्यांनी निवृत्त सैनिकावर गोळीबार केला. गोळीबाराच्या घटनेवेळी तेथे त्याची पत्नी आणि मुलगीही उपस्थित होती. दोघे जखमी झाले आहेत. मंजूर अहमद असे मृत माजी सैनिकाचे नाव आहे. ते कुलगाममधील बेहीबाग येथील रहिवासी आहेत. गोळीबारात त्यांच्या पोटात गोळी लागली. तर त्यांच्या पत्नी आणि मुलीच्या पायात गोळ्या लागल्या. दहशतवाद्यांनी गोळीबार केला तेव्हा ते त्यांच्या पत्नी आणि मुलीसह कारमध्ये होते.(Anantnag Terrorist Attack: सुरक्षा दल दशहशतवाद्यांमध्ये अनंतनागमध्ये चकमक; 2 जवान शहीद)

दहशतवाद्यांना पकडण्यासाठी शोध मोहीम सुरू

2025 मध्ये काश्मीर खोऱ्यात झालेला हा पहिला दहशतवादी हल्ला आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात सुरक्षा व्यवस्था हाय अलर्टवर ठेवण्यात आली आहे. सुरक्षा दलांनी परिसराला वेढा घातला आहे. माजी सैनिक सुमारे पाच वर्षांपूर्वी सैन्यातून निवृत्त झाले होते.