जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात शनिवारी दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत 2 जवान शहीद झाले आहेत. तर 3 जण जखमी झाले आहेत. अहलान गडोले परिसरात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. पोलीस आणि सुरक्षा दलांचे जवानांनी दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिलं आहे.या भागात काही दहशतवादी लपल्याची माहिती पोलीस आणि सुरक्षा दलांना मिळाली होती. यानंतर संपूर्ण परिसरात शोधमोहीम राबवण्यात आली. या ठिकाणी दहशतवाद्यांचा सामना करताना 5 जवान जखमी झाले होते. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले पण दोन जवान उपचारापु्र्वीच शहिद झाले. ( : कुलग्राममध्ये मारले गेलेले हिजबुलचे दहशतवादी कपाटात बांधले होते बंकर, पाहा व्हिडीओ)
2 soldiers killed in encounter with terrorists in J-K's Anantnag
Read @ANI Story | https://t.co/HNgXH6cOBl#JammuKashmir #Anantnag #Encounter pic.twitter.com/iezkU9vxDV
— ANI Digital (@ani_digital) August 10, 2024
या चकमकीत दोन स्थानिक नागरिकही जखमी झाल्याची माहिती आहेत. त्यांच्यावरही उपचार सुरू आहेत. दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी दक्षिण काश्मीर जिल्ह्यातील कोकरनाग भागातील अहलान गडोले येथे घेराबंदी केली आणि शोध मोहीम सुरू केली. पोलिसांनी शनिवारी कठुआ जिल्ह्यातील ढोक भागात 4 दहशतवाद्यांची छायाचित्र जारी केली होती. दहशतवाद्यांबाबत ठोस माहिती देणाऱ्यास 20 लाख रुपयांचे रोख बक्षीस जाहीर केले आहे.
गेल्या काही दिवसांपासून जम्मूमधील भारत-पाकिस्तान सीमेवर दहशतवादी घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर बीएसएफने सैन्याच्या संख्येत लक्षणीय वाढ केली आहे. पंजाब-जम्मू आंतरराज्य सीमेवर सीसीटीव्हीही बसवण्यात आले आहेत.