Fire (Representational image) Photo Credits: Flickr)

तामिळनाडू (Tamil Nadu) येथे एका फटाक्याच्या कारखान्यामध्ये (Firecracker Factory) शुक्रवारी दुपारी जबरदस्त स्फोट झाला आहे. या स्फोटामध्ये पाच कामगार ठार झाले आहेत. तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर जवळच्या रूग्णालयात उपचार सुरू आहेत. मदुराई (Madurai) शहरातील टी. कल्लूपट्टी (T.Kallupatti Area) परिसरात हा कारखाना आहे. अग्निशामन दलाला या आगीची माहिती समजताच त्वरीत घटनास्थळी दाखल झाले आहेत. तसेच कारखान्यात आग लागू नये म्हणून पुरेशी काळजी घेतली होती किंवा नाही? याचाही तपास करण्यात येत आहे.

एएनआय वृत्त संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, तामिळनाडूच्या मदुराई शहरातील टी. कल्लूपट्टी परिसरात असलेल्या एका फटाक्यांच्या कारखान्यात मोठा स्फोट झाला आहे. ज्यात पाच जणांचा मृत्यू तर, तीन जण जखमी झाले आहेत. पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. तसेच जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दिवाळीच्या निमित्ताने या कारखान्यात फटाके तयार करण्याचे काम सुरु होते. परंतु, अचानक आग लागल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. हे देखील वाचा-City Centre Mall Fire Update: मुंबई सेंट्रल जवळील सिटी सेंटर मॉल ची आग लेव्हल 5 ला; अग्निशमन दलाचे आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न कायम

एएनआयचे ट्वीट-

मिळालेल्या माहितीनुसार, आग लागल्याची माहिती होताच अग्निशमनदलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केल्यानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले.  या घटनेवर द्रमुकचे अध्यक्ष एम. के स्टॉलिन यांनी दुख व्यक्त केले आहे. या घटनेत मरण पावलेल्या लोकांच्या कुटुंबियांना लवकरात लवकर आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

याआधी तामीळनाडूमधील फटाक्यांच्या व्यवसायासाठी प्रसिद्ध असणाऱ्या शिवकाशी येथील एका फटाक्याच्या कारखान्यामध्ये गुरूवारी दुपारी जबरदस्त स्फोट झाला होता. या स्फोटामध्ये नऊ कामगार ठार झाले होते. तर, 15 जण गंभीर जखमी झाले होते.