CIty Centre Mall Update| Photo Credits: ANI

मुंबई सेंट्रल (Mumbai Central)  येथे काल (22 ऑक्टोबर) रात्री सिटी सेंटर मॉलला (City Centre Mall) लागलेली आग आता लेव्हल 5 ला पोहचली आहे. दरम्यान या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे अद्यापही सुरू आहेत. अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार, आगीवर नियंत्रण मिळवण्याच्या कामामध्ये सहभागी 2 कर्मचारी देखील जखमी झाले आहेत. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दक्षिण मुंबईत नागपाडा असलेला मुंबई सेंट्रल बस स्थानक परिसरामध्ये हा मॉल आहे. ही आग रात्री सुमारे 8 वाजून 53 मिनिटांनी आग लागली. Mumbai Fire: मुंबईच्या नागपाडा परिसरातील सिटी सेंटर मॉलमध्ये भीषण आग; कोणतीही जीवितहानी नाही (Watch Video).

सिटी सेंटर मॉलच्या नजिक ऑर्किड एन्क्लेव ही 55 मजली इमारती आहे. त्यामधील अंदाजे 3500 रहिवाशांचे सुरक्षिततेची खबरदारी घेत जवळच असलेल्या मैदानात सोय करण्यात आल्याची माहिती मुंबई महानगर पालिकेने दिली आहे. दरम्यान काल रात्रीपासून सिटी सेंटर मॉल आगीची तीव्रता लक्षात घेता बेलासिस रोडवरील दोन्ही बाजूंनी वाहतुकमार्ग बंद करण्यात आली आहे.

ANI Tweet

दरम्यान काही दिवसांपूर्वी वरळी भागात देखील स्फोट हऊन किरकोळ आग लागली होती. त्यानंतर काही दिवसांनी दक्षिण मुंबईमध्येच क्रॉफर्ड मार्केट मध्ये क्रॉकरीच्या मार्केटमध्ये आगीचा भडका उडाला होता तो देखील विझवण्यासाठी फायर ब्रिगेडच्या कर्मचार्‍यांना 2 दिवस लागले होते.