गुरुवारी महाराष्ट्रातील मुंबईतील (Mumbai) नागपाडा परिसरातील सिटी सेंटर मॉल (City Centre Mall) मध्ये भीषण आग (Fire) लागली होती. या आगीमध्ये कोणतीही इजा झालेली नाही किंवा कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, आगीचे नेमके कारण अद्याप कळू शकलेले नाही. हा मॉल मुंबई सेंट्रलमधील क्लासिक रोडवर आहे. मॉलला आग लागल्यानंतर धुराचे लोट बाहेर पडताना दिसत आहेत. वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. मात्र अचानक लागलेल्या या आगीच्या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
मुंबई मिररच्या म्हणण्यानुसार ही आग लेव्हल-1 म्हणून घोषित करण्यात आली. रात्री साडेदहाच्या सुमारास ही आग विझविण्यात आली. या आगीचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे, त्यामध्ये मॉलचा परिसर धुराने भरलेला दिसत आहे. तसेच परिसरात गर्दी जमली आहे. (हेही वाचा: Mumbai Fire: प्लास्टिक PVC फिटिंग मटेरियल नेणाऱ्या कंटेनरला मुंब्रा बायपास जवळ आग; RDMC ची टीम, अग्निशमन दल घटनास्थळी दाखल)
#Fire breaks out at a mall in Nagpada area of #Mumbai; no casualty reported pic.twitter.com/RCG7OCBfhK
— TOI Mumbai (@TOIMumbai) October 22, 2020
दरम्यान, या महिन्याच्या सुरुवातीला मुंबईच्या मस्शिद बंदर परिसरातील कटलरी मार्केट भागात मोठी आग लागली होती. ती आग ‘लेव्हल-3 आग’ म्हणून घोषित करण्यात आली होती. जुम्मा मशिदीजवळील इस्माईल बिल्डिंगच्या पहिल्या मजल्यावर ही आग लागली होती. त्याआधी 21 सप्टेंबर रोजी दक्षिण मुंबई मधील बलार्ड इस्टेट भागात आग लागली होती. या आगीत देखील जीवितहानी झाल्याची माहिती समोर आलेली नव्हती.