प्लास्टिक पीव्हीसी फिटिंग मटेरियल (Plastic PVC Fitting Material) नेणाऱ्या कंटेनरला (Container) मुंब्रा बायपास (Mumbra Bypass) जवळ आग लागल्याची माहिती समोर येत आहे. प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाची टीम (Regional Disaster Management Cell), अग्निशमन दल (Fire Brigade) आणि एक फायर इंजिन (Fire Engine) घटनास्थळी दाखल झालं आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. अद्याप कोणतीही जिवीतहानी किंवा कोणालाही दुखापत झाल्याचे झाल्याचे वृत्त हाती आलेले नाही. सामानाचे कितपत नुकसान झाले हे देखील कळू शकलेले नाही.
आग लागण्याचे कारणही अद्याप स्पष्ट झालेले नाही. परंतु, कन्टेनरला लागलेल्या आगीमुळे वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. दरम्यान, यासंदर्भातील सविस्तर माहिती हाती आलेली नाही. (Mumbai Fire: मुंबईच्या मस्जिद बंदर परिसरातील जुम्मा मशिदीजवळील इस्माईल इमारतीला आग; अग्निशमनदलाच्या 5 गाड्या घटनास्थळी दाखल)
ANI Tweet:
Mumbai: Fire breaks out in a container carrying plastic PVC fitting material near Mumbra Bypass. Regional Disaster Management Cell (RDMC) team, fire brigade & one fire engine on the spot. No casualty or injury reported. Efforts are underway to douse the fire. pic.twitter.com/5OHUH9HKux
— ANI (@ANI) October 18, 2020
दरम्यान, 4 ऑक्टोबर रोजी मुंबईच्या मस्जिद बंदर परिसरातील जुम्मा मशिदीजवळील इस्माईल इमारतीला आग लागली होती. या आगीत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नव्हते. 21 सप्टेंबर रोजी दक्षिण मुंबई मधील बलार्ड इस्टेट भागात आग लागली होती. या आगीत देखील जीवितहानी झाल्याची माहिती समोर आलेली नव्हती.