Mumbai Fire: मुंबईच्या मस्जिद बंदर परिसरातील जुम्मा मशिदीजवळील इस्माईल इमारतीला आग; अग्निशमनदलाच्या 5 गाड्या घटनास्थळी दाखल
मुंबईच्या मस्जिद बंदर परिसरातील जुम्मा मशिदीजवळील इस्माईल इमारतीला आग लागल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. इमारतीच्या पहिल्या मजल्यावर ही आग लागल्याचे समजत आहे.
मुंबईच्या (Mumbai) मस्जिद बंदर (Masjid Bunder) परिसरातील जुम्मा मशिदीजवळील (Jumma Masjid) इस्माईल इमारतीला (Ismail Building) आग लागल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. इमारतीच्या पहिल्या मजल्यावर ही आग लागल्याचे समजत आहे. दरम्यान, अग्निशमनदलाच्या 5 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. तसेच ही आग कशामुळे लागली? याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही. एएनआय वृत्तसंस्थेने याबाबत माहिती दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अग्निशमनदलाच्या 5 गाड्या आणि 4 जम्बो टॅंकर घटनास्थळी दाखल झाले आहेत. सध्या कोणत्याही जीवितहानीची नोंद नसून आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. हे देखील वाचा- Thane Fire: हिरानंदानी इस्टेट परिसरातील Arcadia Shopping Center मध्ये आग; अग्निशमन दल घटनास्थळी दाखल
एएनआयचे ट्विट-
Mumbai: A fire broke out on the 1st floor of Ismail Building near Jumma Masjid in Masjid Bunder's Cutlery market area today. 5 fire engines present at the spot. No injuries reported so far. Operation underway to douse the fire.
— ANI (@ANI) October 4, 2020
याआधी 22 ऑगस्ट रोजी मुंबईच्या परळ परिसरातील हिंदमाता सिनेमाजवळ क्रिस्टल इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर आग लागल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली होती. या आगीत चार जणांचा मृत्यू झाला होता तर, इतर 14 जण जखमी झाल्याची माहिती समोर आली होती.
(The above story first appeared on LatestLY on Oct 04, 2020 06:08 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

