Thane Fire | ANI Tweet

मुंबई नजिक ठाणे परिसरामध्ये आज (2 ऑक्टोबर) सकाळी आग लागल्याचे वृत्त समोर आले आहे. ठाणे पश्चिम येथील हिरानंदानी इस्टेट परिसरात असलेल्या Arcadia Shopping Center मध्ये ही आग लागलेली आहे. आग लागल्याचे वृत्त समजताच तात्काळ अग्निशमन दल, रिजनल डीझास्टर मेंएजमेंट सेंटर यांच्यासोबत फायर इंजिन टॅंकर्स व quick response vehicle दाखल झाले आहेत. ANI tweets कडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, अद्याप या घटनेमध्ये सुदैवाने कोणत्याही जीवितहानी किंवा जखमी असल्याचे वृत्त देण्यात आलेले नाही. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सुरू आहे.

ठाण्याच्या Arcadia Shopping Center मध्ये आग नेमकी कशामुळे लागली याचं कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र सध्या आग नियंत्रणामध्ये आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

ANI Tweet

दोन दिवसांपूर्वीच ठाण्यात रेमांडच्या कार्यालयामध्ये आग लागली होती. पहाटेच्या वेळेस लागलेल्या या आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले होते. या घटनेतही कोणतीही जीवितहानी झालेली नव्हती. दरम्यान ठाण्यात ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचे वृत्त त्यावेळेस देण्यात आले होते.