रामबन (Ramban) भागातील बाटोटे (Batote) येथे शनिवारी सुरक्षा दल आणि अतिरेक्यांमध्ये चकमकी झाली. या चकमकीत सुरक्षा दलांनी 3 अतिरेकी ठार केले (Encounter) आहेत. या चकमकीपूर्वीचा एक व्हिडिओ एएनआय (ANI) या वृत्तसंस्थेने जाहीर केला आहे. या व्हिडिओमध्ये एक महिला अधिकारी दहशतवाद्यांना शरण जाण्यास सांगत आहे. एसएसपी अनिता शर्मा ( SSP Anita Sharma) असे या महिला ऑफिसरचे नाव आहे. व्हिडिओमध्ये ही महिला अधिकारी गच्चीवर उभी असून माइकवर लपून बसलेल्या दहशतवाद्याला (Terrorist) बाहेर पडण्यास सांगत आहेत.
व्हिडिओमध्ये एसएसपी अनीता शर्मा माईकच्या माध्यमातून दहशतवाद्यांशी संपर्क साधताना दिसत आहेत. या व्हिडिओत भारतीय लष्कर दहशतवाद्यांना आत्मसमर्पण करायला सांगत आहे. दरम्यान, अनिता शर्मा यांनी दहशतवाद्यांना बाहेर या असे अवाहन केले होते. "तुम्हाला काळजी करण्याची काहीच आवश्यकता नाही, तुम्ही बाहेर आल्यानंतर तुम्हाला कोणीही स्पर्श करणार नाही", असे शर्मा म्हणाल्या होत्या. यासाठी दहशतवाद्यांना 15 मिनिटांचा कालावधी देण्यात आला होता. एसएसपीच्या आदेशानुसार दहशतवाद्यांनी आत्मसमर्पण केले नाही, त्यानंतर सुरक्षा दलाने त्यांच्यावर हल्ला चढवत दहशतवाद्यांना ठार केले. दहशतवादी रामबन जिल्ह्या येथील एका घरात घुसले आणि तेथील लोकांचे अपहरण केले होते. या लोकांना बचावण्यात भारतीय लष्काराला यश आले आहे. परंतु या गोळीबारात एक सैनिक शहीद झाला आहे, तर 2 पोलिस जखमी झाले आहेत. हे देखील वाचा-जम्मू-काश्मीरच्या रामबन जिल्ह्यात संशयित अतिरिक्यांकडून भारतीय सैनिकांवर भ्याड हल्ला; शोधमोहीम सुरू
ANI चा व्हिडिओ-
#WATCH Anita Sharma, SSP Ramban, asking terrorists to surrender during the encounter in Batote town of Ramban district of Jammu Zone, earlier today. #JammuAndKashmir pic.twitter.com/jcxGm3CkNy
— ANI (@ANI) September 28, 2019
दहशतवाद्यांकडून रामबन जिल्ह्यातील बाटोट-डोडा रोडवर शनिवारी सकाळी 7.30 च्या सुमारास बाटोट येथे एनएच 244 वर 2 संशयितांनी बस थांबविण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, ड्रायव्हरने वाहन थांबवता जवळच्या सैन्याच्या चौकीला कळविले. त्यानंतर क्यूआरटीने तपास सुरू केला आहे.सुरक्षा दलांना येताना पाहून दहशतवाद्यांनी त्यांच्यावर ग्रेनेड फेकले आणि ते घटनास्थळावरून पळून गेले. सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांचा पाठलाग केला असता दहशतवादी घरात लपून बसले आणि घरात उपस्थित लोकांचे अपहरण केले. यानंतर भारतीय लष्काराने दहशतवाद्यांना आत्मसमर्पमण करण्यात सांगितले. दरम्यान, दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. प्रत्युत्तरात सुरक्षा दलाने 3 दहशतवाद्यांना ठार केले.