Crime: बहिणीने केला आंतरजातीय विवाह, भावाने जेवण्यासाठी घरी बोलवून जोडप्याची केली हत्या
Crime | (Photo Credits: Pixabay)

चेन्नई (Chennai) येथे एका आठवड्यापूर्वी कुटुंबीयांच्या इच्छेविरुद्ध विवाह केलेल्या जोडप्याची वधूच्या भावाने आणि अन्य एका नातेवाईकांनी हत्या (Murder) केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुंभकोणमजवळील (Kumbakonam) चोलापुरममधील (Cholapuram) थुलुक्कवेली (Thulukkaveli) येथे सोमवारी ही घटना घडली. पोलिसांनी सांगितले की, तिरुवन्नमलाई येथील मोहन आणि कुंभकोणमजवळील थुलुक्कावेली येथील सरन्या अशी मृतांची नावे काही महिन्यांपूर्वी चेन्नई येथे भेटली होती. सरन्या एका खाजगी रुग्णालयात परिचारिका म्हणून काम करत होती आणि दोघेही प्रेमात पडले होते. अनुसूचित जाती समुदायातील सरन्याला कथितपणे तिच्या कुटुंबाकडून तीव्र विरोधाचा सामना करावा लागला होता.

जेव्हा तिने मोहनसोबत तिचे नाते उघड केले होते. जो अधिक मागासवर्गीय समाजाचा होता. कुटुंबीयांनी सरन्याला मोहनशी लग्न करू देण्यास नकार दिला होता आणि रंजित या जवळच्या नातेवाईकासोबत लग्न निश्चित केल्याचे तिला सांगितले होते. अशा परिस्थितीत सरन्या आणि मोहनने आठवड्याभरापूर्वीच घरच्यांच्या इच्छेविरुद्ध लग्न केले होते. हेही वाचा Jammu-Kashmir Update: श्रीनगरमध्ये लष्कर-ए-तैयबाचे दोन दहशतवादी ठार, चकमकीत पोलीस कर्मचारीही जखमी

लग्नाची बातमी ऐकून सरन्याचा भाऊ शक्तीवेल याने कुटुंबाला या जोडप्याशी समेट घडवायचा आहे असे भासवून तिला आणि मोहनला जेवणासाठी घरी बोलावले होते.  सोमवारी दुपारी या जोडप्याने कुंभकोणम येथे पोहोचून जेवण केले. दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास हे जोडपे चेन्नईला परत जाण्यासाठी घराबाहेर पडले तेव्हा शक्तीवेल आणि रंजीत यांनी त्यांच्यावर चाकूने हल्ला केला आणि रक्तबंबाळ होऊन त्यांचा मृत्यू झाला.

स्थानिकांनी सूचना दिल्यानंतर चोलापुरम पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह कुंभकोणम येथील सरकारी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवले. भारतीय दंड संहितेच्या कलम 302 (हत्या) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींना अटक करून नंतर कोठडी सुनावण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.