Rajasthan Horror: बायकोचे माहेर दाखवतो म्हणून चुलत बहिणीला सोबत घेऊन गेला, रस्त्यातच तिच्यावर केला बलात्कार; राजस्थान येथील धक्कादायक घटना
Representational Image | Rape (Photo Credits: PTI)

देशात महिला अत्याचार आणि अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या बलात्काराचे सत्र थांबायला तयार नाही. देशातील विविध कोपऱ्यातून दररोज हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटना समोर येत आहेत. यातच राजस्थानच्या (Rajasthan) जयपूर (Jaipur) येथून बहिण-भावाच्या नात्याला कामिळा फासणारी घटना घडली आहे. बायकोचे माहेर दाखवायला अल्पवयीन चुलत बहिणीला सोबत घेऊन गेला आणि रस्त्यातच तिच्यावर बलात्कार केल्याची केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना गल्टा पोलीस ठाण्याच्या हद्दीत 8 ऑक्टोबर रोजी घडली आहे. या घटनेनंतर आरोपी फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडिता ही आरोपीची चुलत बहिणी आहे. तर, आरोपीची पत्नी आणि पीडिता या देखील चांगल्या मैत्रीणी आहेत. आरोपीची पत्नी तिच्या माहेरी असून पीडिताला तिला भेटायचे होते. परंतु, पीडिताला आरोपीच्या बायकोच्या माहेरचा पत्ता माहिती नव्हता. यासाठी तिने तिच्या आरोपीला बोलावून घेतले. दरम्यान, आरोपीने पीडिताला बायकोच्या माहेरी घेऊन जाण्याचे वचन दिले. परंतु, 8 ऑक्टोबर रोजी आरोपीने पीडिताला बायकोच्या माहेरी घेऊन न जाता गल्टा गेटजवळील एका निर्जन ठिकाणी नेले आणि तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर पीडित मुलगी आपल्या घरी परतली आणि तिच्यासोबत घडलेला संपूर्ण प्रकार तिच्या पालकांच्या कानावर घातला. त्यांनी त्वरीत गल्टा पोलीस ठाणे गाठले आणि आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. हे देखील वाचा- Rajasthan Shocker: मुलाच्या हव्यासापोटी पत्नीची हत्या, पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पतीला अटक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेनंतर आरोपी फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. तर, चुलत भावाने आपल्यासोबत केलेल्या धक्कादायक कृत्यानंतर पीडिता खूप घाबरली आहे. पोलिसांनी पीडिताला घाबरू नको, असे सांगत आरोपीविरोधात कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहेत.