SP Leader Ahmad Hasan Passed Away: समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते अहमद हसन यांचे निधन, लखनऊच्या लोहिया रुग्णालयात सुरू होते उपचार
SP Leader Ahmad Hasan (PC - Facebook)

SP Leader Ahmad Hasan Passed Away: समाजवादी पक्षाचे (Samajwadi Party) ज्येष्ठ नेते, माजी मंत्री आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अहमद हसन (Ahmad Hasan) यांचे आज लखनौ येथे निधन झाले. राम मनोहर लोहिया रुग्णालयात (Lohiya Hospital) त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते बर्याच काळापासून आजारी होते. तत्पूर्वी, 16 डिसेंबर रोजी उत्तर प्रदेश विधिमंडळाच्या अधिवेशनादरम्यान छातीत दुखू लागल्याने त्यांना KGMU च्या लॉरी कार्डिओलॉजी विभागात दाखल करण्यात आले होते. यावेळी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांची भेट घेतली होती.

कोण आहेत अहमद हसन?

उत्तर प्रदेशातील आंबेडकर नगर येथे जन्मलेले अहमद हसन यांचे वडील व्यापारी आणि प्रसिद्ध धार्मिक विद्वान होते. अहमद हसन यांनी अलाहाबाद विद्यापीठात कायद्याचे शिक्षण घेतले. नंतर तो यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊन भारतीय पोलीस सेवेत अधिकारी झाले. 1960 मध्ये त्यांना पहिल्यांदा लखनौच्या डीएसपीची जबाबदारी मिळाली. त्यांच्या कार्यकाळात त्यांना अनेक सन्मानही मिळाले. (वाचा - Ravish Tiwari Passed Away: ज्येष्ठ पत्रकार रविश तिवारी यांचे निधन, राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला शोक)

मुख्यमंत्री योगींनी व्यक्त केला शोक -

विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अहमद हसन यांच्या निधनावर मुख्यमंत्री योगी यांनी शोक व्यक्त केला आहे. श्रद्धांजली वाहताना त्यांनी लिहिले की, उत्तर प्रदेश विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अहमद हसन यांचे निधन अत्यंत दुःखद आहे. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो आणि शोकाकुल कुटुंबाला हे नुकसान सहन करण्याची शक्ती मिळो.