
... तर मंडळी, तो ऐतिहासिक क्षण आता काही मिनिटांवर येऊन ठेपला आहे. केरळमधील शबरीमाला मंदिराचे दरवाजे आज (बुधवार, १७ ऑक्टोबर) सायंकाळी पाच वाजलेपासून महिलांसाठी कायमचे उघडले जाणार आहेत. केवळ केरळच नव्हे तर, भारतासह अवघे जग या ऐतिहासीक क्षणांचे साक्षिदार ठरेल. या निर्णयासाठी दस्तुरखूद्द सर्वोच्च न्यायालयाला निर्णय द्यावा लागला. देशभरातील महिला अनेक संस्था आणि संघटनांनी महिलांच्या हक्कासाठी निर्णायकी लढा दिला. अखेर या लढ्याला यश आले सर्वोच्च न्यायालयाने शबरीमाला मंदिराचे दरवाजे महिलांसाठी कायमचे उघडले. दरम्यान, या निर्णयाला देशभरातून कडाडून विरोधही झाला. आजही हा निर्णय आमलात येणार हे वास्तव असताना, मंदिराचे दरवाजे महिलांसाठी उघडले जाऊ नयेत यासाठी भक्तांनी मंदिर परिसरात गर्दी केली आहे.
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मंदिरात पहिल्यांदाच १० ते ५० वर्षे वयोगटातील मुली आणि महिला मंदिरात प्रवेश करू शकतील. दरम्यान, या निर्णयावरुन वातावरण प्रचंड तापले आहे. केरळमध्ये मोठी तणावग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. पाच दिवसांच्या मासिक पूजेसाठी अयप्पा स्वामी मंदिर उघडण्यापूर्वी मंदिर परिसरात असलेल्या दोन्ही प्रमुख रस्त्यांवर आक्रमक भक्तांची मोठी गर्दी जमली आहे. अनुचीत प्रकार टाळण्यासाठी मोठा पोलीसफाटा तैनात करण्यात आला असून, मंदिर परिसराला छावणीचे स्वरुप आले आहे. (हेही वाचा, नारीशक्तीचा विजय! शबरीमाला मंदिराचे दरवाचे महिलांसाठी खुले; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय)
दरम्यान, मंदिरात दर्शानासाठी आलेल्या अनेक महिला तणावाची परिस्थीती पाहून परत गेल्याचे वृत्त आहे. तर, काही ठिकाणी पोलीस आणि प्रसारमाध्यमांच्या वाहनांवर दगडफेक झाल्याच्या घटना घडल्याचे वृत्त आहे. पोलिसांनी निलक्कल आणि पम्बा येथून महिलांच्या मंदिर प्रवेशाला विरोध करणाऱ्या त्रावणकोर देवासरम बोर्डाचे माजी अध्यक्षांसह सुमारे ५० आंदोलकांना ताब्यात घेतले आहे.