तुम्ही सहलीवर असाल किंवा हॉटेलच्या बंद खोलीत तुमचे काही वैयक्तिक क्षण घालवायचे असतील तर काळजी घ्या, तुमच्या या खासगी क्षणांवरही कुणाची नजर असू शकते. असाच एक प्रकार देशाच्या राजधानीच्या उपनगरातील द्वारका (Dwarka) येथील एका हॉटेलमध्ये समोर आला आहे. या हॉटेलचे कर्मचारी येथे राहणाऱ्या लोकांचे व्हिडिओ बनवायचे आणि नंतर त्यांना ब्लॅकमेल करायचे असा आरोप आहे. तक्रारीचा तपास करत असताना दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) आरोपी कर्मचारी आणि त्याच्या दोन साथीदारांना अटक (Arrested) केली आहे.
दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे प्रकरण द्वारका येथील हॉटेल द ग्रेट इनशी संबंधित आहे. गेल्या काही दिवसांपासून एक जोडपं इथे राहात होतं. येथून परतल्यानंतर त्यांना मोबाईलवर मेसेज आला की तुमच्या खाजगी क्षणांचा एक सुंदर व्हिडिओ रेकॉर्ड करण्यात आला आहे. या व्हिडिओच्या बदल्यात मेसेज पाठवणाऱ्याने पाच लाख रुपयांची मागणी केली होती. न दिल्यास सोशल मीडियावर टाकू, अशी धमकी दिली. हेही वाचा Telangana Shocker! पत्नीच्या आत्महत्येनंतर तेलंगणातील पोलिस अधिकाऱ्याची स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या
हा मेसेज वाचून या जोडप्याच्या पायाखालची जमीनच सरकली. थोडा वेळ सावरल्यानंतर पीडितेने ठरवले की आपण या बदमाशांपुढे झुकणार नाही. यानंतर पोलिसात तक्रार देण्यात आली. दिल्ली पोलिसांचे डीसीपी एम हर्षवर्धन यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी ही तक्रार प्राधान्याने घेतली. तपास सुरू केला असता अशी घटना बाहेरील कोणी नसून हॉटेलच्या रिसेप्शनिस्टने घडवून आणल्याचे दिसून आले.
पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्यानंतर चौकशी केली असता संपूर्ण प्रकरण समोर आले. यानंतर पोलिसांनी आरोपीसह त्याच्या दोन साथीदारांना अटक केली. एसीपी राम अवतार यांनी सांगितले की, आरोपींविरुद्ध आयटी कायदा, खंडणी आणि इतर संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी सर्वप्रथम ज्या इन्स्टाग्राम आयडीवरून मेसेज पाठवला होता त्या आयडीचा शोध घेतला आणि डायव्हर्शन मॅपिंग केले. हेही वाचा DMK MLAs Driving Bus: डीएमके आमदाराने बस चालवली, खांबाला धडकवली खड्ड्यात घातली (Watch Video)
ज्या फोनवरून हा मेसेज आला आहे तो फोन हॉटेलमध्येच असल्याचे आढळून आले. यानंतर पोलिसांनी सापळा रचून आरोपीला त्याच्या हॉटेलमधूनच ताब्यात घेतले. यानंतर पोलिसांनी आरोपीच्या दोन्ही साथीदारांना हापूर येथून अटक केली. आरोपीने पोलिसांना सांगितले की, तो मे 2022 मध्ये नोकरीनिमित्त हॉटेलमध्ये रुजू झाला होता. येथेच काम सुरू असताना त्याला हॉटेलमध्ये राहणाऱ्या लोकांना ब्लॅकमेल करण्याची कल्पना सुचली आणि तो अंकुर आणि दिनेश या मित्रांसोबत या व्यवसायात उतरला. या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी बनावट पत्त्यावर आरोपींना सिमकार्ड देणाऱ्या दुकानदार दीपलाही अटक केली आहे.