(Photo credit: Twitter)

द्रमुकचे (DMK ) आमदार सीव्हीएमपी एझिलारासन (CVMP Ezhilarasan) यांना बस चालवण्याची इच्छा झाली. ती पुरी करण्यासाठी त्यांनी बसचे स्टेरींग हाता घेतले खरे. पण, वाहन हाकण्याचा पुरेसा अनुभव नसल्याने आमदार महोदयांकडून भलताच स्टंट घडला. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (CVMP Ezhilarasan Viral Video) झाला आहे. बस रस्त्यावरुन चालण्या ऐवजी चक्क खांबाला धडकली आणि पुढे खड्ड्यातही गेली. उपस्थितांच्या प्रसंगावधानामुळे संभाव्य धोका टळला, कोणताही दुखापत झाली नाही.सीव्हीएमपी हे कांचीपुरम (Kancheepuram) येथील आमदार आहेत.

प्राप्त माहितीनुसार, द्रमुकचे आमदार सीव्हीएमपी एझिलारासन यांच्या हस्ते त्यांच्या मतदारसंघातील नव्या बस मार्गाचे उद्घाटन झाले. या वेळी त्यांनी सरकारी बसला हिरवा झेंडा दाखवला. दरम्यान, त्यांनी बस चालविण्याचा मनोदय व्यक्त केला. पण त्यामुळे ते भलतेच अडचणीत आले. सोशल मीडियावर त्यांच्या व्हिडिओला जोरदार प्रतिक्रिया येत आहेत.

सीव्हीएमपी एझिलारासन यांनी बसचे स्टेरींग हातात घेतले खरे पण पुढच्या काहीच क्षणात त्यांचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस रस्त्याच्या कडेला जाऊन खांबावर आदळली. पुढे ही बस रस्त्याकडेला असलेल्या छोट्या खड्ड्यातही जाऊन अडकली. या घटनेनंतर बसमध्ये बसलेल्या डीमके कार्यकर्त्यांची चांगलीच भंबेरी उडाली. त्यांनी बसमधून पटापट खाली उड्या टाकल्या आणि जीव वाचवला. नंतर त्यांनी हाताने धक्का मारत बस खड्ड्यातून बाहेर काढली.

घटनेत बसचे भलतेच नुकसान झाले. नंतर मात्र आमदार महोदयांनी बस चालवली नाही. ते बाजूला झाले आणि खड्ड्यातून बाहेर काढलेली बस सरकारी चालकाने हाकण्यास सुरुवात केली.

DMK (द्रविड मुनेत्र कळघम) हा तामिळनाडू राज्यातील एक राजकीय पक्ष आहे. पक्षाची स्थापना 1949 मध्ये सी.एन. अण्णादुराई यांनी केली. तेव्हापासून तामिळनाडूच्या राजकारणात पक्षाची प्रमुख भूमिका राहिली आहे. हा पक्ष द्रविडीयन राजकीय पक्ष आहे. त्याची विचारधारा सामाजिक न्याय, जातिवादविरोधी आणि तमिळ राष्ट्रवादाच्या तत्त्वांवर आधारित आहे. (हेही वाचा, Video: शरद पवारांच्या बॉलिंगवर पृथ्वीराज चव्हाण यांची दमछाक; फटकावला नाही एकही चेंडू)

व्हिडिओ

द्रमुकच्या काही प्रमुख नेत्यांमध्ये एम.के. स्टॅलिन, के. अनबाझगन आणि एम.के. अलागिरी यांचा समावेश आहे. पक्षाचे चिन्ह उगवता सूर्य आहे आणि त्याचा अधिकृत ध्वज लाल आणि काळा आहे आणि मध्यभागी उगवत्या सूर्याचे चिन्ह आहे. द्रमुक समाजकल्याण कार्यक्रमांना भक्कम पाठिंबा आणि सांप्रदायिकता आणि धार्मिक कट्टरतावादाला विरोध म्हणून ओळखले जाते.