... म्हणून अमेरिकन डॉलरसमोर रूपयाची सतत होतेय घसरण
अमेरिकन डॉलर आणि भारतीय रूपया Photo Credits : pexels.com

डॉलरच्या तुलनेत सातत्याने रूपयाचं होणारं अवमूल्यन ही भारतीयांच्या दृष्टीने चिंता वाढवणारी गोष्ट आहे. जागतिक स्तरावर कच्च्या तेलाची वाढणारी किंमत, पेट्रोल, डिझेलचे दर वाढल्याने सामान्यांची होणारी होरपळ ते अगदी परदेशात शिकायला गेलेल्या विद्यार्थांना, त्यांच्या पालकांना बसणारा आर्थिक फटका अशा विविध स्तरावर डॉलरसमोर रूपयांवर वाढणारा दबाव परिणामकारक ठरत आहे. आज गुरूवार (4 ऑक्टोबर) रोजी रूपयाने डॉलरसमोर नवा निच्चांक गाठला आहे. सध्या डॉलरसमोर भारतीयांना 73.34 रूपये मोजावे लागत आहेत.

जागतिक स्तरावर घडणार्‍या अनेक घडामोडींचा अर्थव्यवस्थेवर प्रतिकूल परिणाम होत आहे. भविष्यात ही घसरण अजून कायम राहण्याची गरज आहे. मग रूपयाने डॉलरसमोर पंचाहत्तरी गाठली तरी आश्चर्य नसावं असे काही अर्थतज्ञ आणि विश्लेषकांनी भाकीत वर्तवले आहे.

डॉलरसमोर का घसरतोय रूपया ?

डॉलर हे जगभरात विविध व्यवहारांसाठी वापरलं जाणारं चलन आहे. जेव्हा डॉलरची मागणी वाढते आणि पुरवठा कमी होतो परिणामी स्थानिक चलनाचं अवमूल्यन होतं. त्यामुळे डॉलरसमोर रूपया घसरत आहे.

सध्या जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्या आहे, अमेरिका आणि चीनमध्ये ट्रेड वॉर सुरू आहे, करंट अकाऊंट डेफिसिट वाढण्याची शक्यता असल्याने त्याचा परिणाम रूपयावरही होत आहे. आयत करणार्‍यांकडून सतत डॉलरची मागणी वाढत आहे. त्यामुळे विदेशी गुंतवणूकदार सतत त्यांनी केलेली गुंतवणूक काढून घेत आहेत. परिणामी रूपायावरील दबाव वाढत चालला आहे.

शेअर बाजार गडगडतोय

रूपयाच्या अवमूल्यनाचा परिणाम हा शेअर बाजरावरही ताबडतोब होतोय. फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टर्सनीही 38.32 करोड डॉलर रूपये काढल्याने शेअर बाजारात निराशा आहे. त्यामुळे गुरुवारी सेंसेक्स 633 खाली गेल्याने 35,341.68 वर पोहचले आहे. तर निफ्टीमध्ये 194.6 ची घरसण झाल्याने तो 10,663.65 पर्यंत पोहचला आहे.

रूपयांची कामगिरी असमाधानकारक

मागील काही वर्षांमध्ये डॉलरसमोर रूपयांची होणारी घसरण ही अनेक कारणांसाठी चिंतेचा विषय बनली आहे. आशियामध्ये रूपयाची कामगिरी सर्वात जास्त निराशाकारक आहे. त्याचा परिणाम भारतीय शेअर बाजारावरही होत आहे.