Close
Advertisement
 
बुधवार, जानेवारी 22, 2025
ताज्या बातम्या
8 minutes ago

Rajasthan: राजस्थानमध्ये गटाराची टाकी साफ करताना 3 मजुराचा गुदमरून मृत्यू

राजस्थानमधील सीकर जिल्ह्यातील फतेहपूर पोलीस स्टेशन परिसरात मंगळवारी संध्याकाळी सीवरेज टाकी साफ करताना तीन मजुरांचा गुदमरून मृत्यू झाला. पोलिस ठाण्याचे अधिकारी सुभाष बिजारनियान यांनी सांगितले की, एलएनटी कंपनीकडून सारदापुरा येथील गटाराच्या टाकीची साफसफाई करण्यात येत होती.

राष्ट्रीय Shreya Varke | Oct 23, 2024 09:10 AM IST
A+
A-
Three laborers died of suffocation while cleaning sewerage tank Representative Image

Rajasthan: राजस्थानमधील सीकर जिल्ह्यातील फतेहपूर पोलीस स्टेशन परिसरात मंगळवारी संध्याकाळी सीवरेज टाकी साफ करताना तीन मजुरांचा गुदमरून मृत्यू झाला. पोलिस ठाण्याचे अधिकारी सुभाष बिजारनियान यांनी सांगितले की, एलएनटी कंपनीकडून सारदापुरा येथील गटाराच्या टाकीची साफसफाई करण्यात येत होती. गटाराची टाकी साफ करण्यासाठी आलेल्या तीन मजुरांचा गुदमरून मृत्यू झाला. पोलीस अधिकाऱ्याने सांगितले, “एक मजूर खाली जाऊन 20 फूट खोल टाकी साफ करत होता. यादरम्यान तो बेशुद्ध झाला. हे देखील वाचा: Viral Video: रस्त्या विचारण्याच्या बहाण्याने दोन चोरांनी एका वृद्ध व्यक्तीला लुटले, घटनेचा व्हिडीओ व्हायरल

त्याला वाचवण्यासाठी त्याचे दोन साथीदार आत गेले, मात्र तेही बेशुद्ध झाले. त्यांनी सांगितले की, तिन्ही मजुरांना बाहेर काढून रुग्णालयात नेण्यात आले, तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने सांगितले की, सज्जन कुमार (४०), राजेश उर्फ ​​महेंद्र (३८) आणि मुकेश (३३) अशी मृतांची नावे आहेत.


Show Full Article Share Now