Rahul Gandhi On BJP: जसा अयोध्येत पराभव झाला, तसच गुजरात राज्यातही भाजपचे होणार; राहुल गांधी यांचे मोठं वक्तव्य
Rahul Gandhi | (Photo credit: archived, edited, representative image)

गुजरामधील या विजयानंतर काँग्रेस पक्ष उभारी घेईल, अयोध्येत जसा भाजपचा पराभव झाला तसाच गुजरातमध्येही होणार आहे. पंतप्रधान मोदींना वाराणसीत निसटता विजय मिळाला, केवळ एक लाख मतांनी ते विजयी झाले. तर अयोध्येतून निवडणूक लढले असते तर दारून पराभवाला सामोरं जावं लागलं असंत. जसा अयोध्येत भाजपचा पराभव झाला, तसाच पराभव गुजरातमध्येही होणार आहे, असं भाकीत लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी केलं आहे. ( Aaditya Thackeray On BMC Elections: बीएमसीच्या निवडणुका लवकरात लवकर घ्या, महाराष्ट्र विधानसभेत आदित्य ठाकरेंची मागणी)

राहुल गांधी आज गुजरातच्या दौऱ्यावर असून अहमदाबादमध्ये त्यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांशी संवाद साधला. कार्यकर्त्यांना संबोधित करताना राहुल गांधींनी पंतप्रधान मोदी आणि भाजपवर जोरदार टिका केली. तुम्ही खूप त्रास सहन केला आहे, खूप लाठीचार्ज सहन केला आहे,. मी स्वत:, प्रियंका गांधी, पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांसह राष्ट्रीय काँग्रेसची संपूर्ण टीम तुमच्यासोबत आहे. सर्वजण मिळून यांना सरकारमधून खाली खेचायचं आहे. त्यांनी आमच्या कार्यालयावर हल्ला केला, मात्र घाबरण्याची गरज नाही. यातून त्यांनी आम्हाला आव्हान दिलं आहे, हे आव्हान स्वीकारून गुजरातमध्ये भाजपचा पराभव करायचा आहे. गुजरातमध्ये काँग्रेस पक्ष नरेंद्र मोदी आणि भाजपचा पराभव करणार आहे.

राम मंदिराचं उद्घाटन केले आणि उद्घाटनाला अदानी-अंबानी यांना निमंत्रण दिलं. मात्र गरीब जनता दिसली नाही. अयोध्या विमानतळासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्या, मात्र शेतकऱ्यांना आजपर्यंत नुकसान भरपाई मिळालेली नाही. राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात अयोध्येतील कोणीही सहभागी झालं नव्हतं. कारण भाजपला अयोध्येतून राजकारण करायचं होतं. भाजपने प्रभू रामाच्या नावावर राजकारण केलं, असा गंभीर आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.