PM Modi and Rahul Gandhi (Photo Credits: PTI)

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी कोरोना व्हायरसच्या (Corona Virus)

मुद्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi)यांच्यावर टीकास्त्र डागल आहे. सोशल मीडिया अकाउंटवर विदुषकी खेळ खेळून भारताचा वेळ वाया घालवणं बंद करा, अशा शब्दांत राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून मोदींवर निशाणा साधला आहे. तसेच या ट्विटसोबत त्यांनी चीनच्या पंतप्रधान कार्यालयाकडून जारी करण्यात आलेला एक व्हिडिओही शेअर केला आहे.

राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय की, 'सध्या भारत आपत्कालीन परिस्थितीला सामोरं जात आहे. त्यामुळे तुमच्या सोशल मीडिया अकाउंटवर विदुषकी खेळ खेळून भारताचा वेळ वाया घालवणं बंद करा आणि भारतीयावर लक्ष केंद्रीत करा.' (हेही वाचा - Travel Advisory on COVID-19: भारतामध्ये कोरोना व्हायरसचा प्रभाव रोखण्यासाठी नवी नियमावली जारी)

राहुल गांधी यांनी आपल्या दुसऱ्या ट्विटमध्ये म्हटलंय की, प्रत्येक देशावर असं संकट येत की, तेव्हा देशातील नेत्यांची कसोटी लागते. भारतावर कोरोना व्हायरससारख भयानक संकट उभ आहे. त्यामुळे याचा परिणाम भारतावरही होऊ शकतो. कोरोना व्हायरसचा देशातील जनतेला आणि अर्थव्यवस्थेला धोका आहे. परंतु, सरकार याकडे गांभिर्याने लक्ष देत नाही. यावर वेळीच उपाययोजना करण गरजेच आहे, असंही राहुल गांधी यांनी म्हटलंय.

दरम्यान राहुल गांधी यांनी मोदींच्या सोशल मीडिया प्रकरणावर टीका करत तुम्ही सोशल मीडिया सोडू नका, पण द्वेष करणं सोडा, असा सल्ला दिला होता. मात्र मोदी शल मीडिया सोडणार नाहीत, हे आज स्पष्ट झाल आहे. जागतिक महिला दिनाच्या दिवशी आपली सर्व सोशल मीडिया अकाऊंट्स महिलांना हँडल करायला देणार असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केलं आहे.